S M L

स्कूल बस मालकांनी पुकारला एका दिवसाचा बंद

18 डिसेंबरराज्यभरातल्या स्कूल बस मालकांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. स्कूलबससाठी सरकारने घातलेल्या अटींचा निषेध करण्यासाठी त्यांचा हा संप आहे. हे स्कूल बस मालक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सोमवारी भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडे निवेदन सादर करणार आहेत. स्कूलबससाठी परिवहन विभागाने 23 अटी घातल्या आहेत. त्यातल्या पाच ते सहा अटी पूर्ण करता येणार नाहीत असं या स्कूलबस मालकांचे म्हणणं आहे. अटी शिथिल करण्यात आल्या नाहीत तर 1 जानेवारीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशने घेतला आहे.या संदर्भात चेंबूरच्या आदर्श विद्यालयात एक बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाणे,पुणे आणि मुंबईतील बस मालक हजर होते.परिवहन विभागाने एकूण 23 अटी घातल्या आहेत.त्यातील 5 ते 6 अटी पूर्ण करणं शक्य नसल्याचा पवित्रा या संघटनेनं घेतला आहे. खिडक्याना 5 सेंटीमिटर वर बाहेरुन लोखंडी रॉड लावणे,15 वर्षच बस चालवणे या अटींच्या विरोधात ही संघटना आहे. या बैठकीत ठाणे आरटीओ विरोधात बसमालकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी या तक्रारींबद्दल चर्चा करण्यात येणार असल्याचे असं संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्गे यांनी सांगितलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 02:55 PM IST

स्कूल बस मालकांनी पुकारला एका दिवसाचा बंद

18 डिसेंबर

राज्यभरातल्या स्कूल बस मालकांनी मंगळवारी एक दिवसाचा बंद पुकारण्याचा इशारा दिला आहे. स्कूलबससाठी सरकारने घातलेल्या अटींचा निषेध करण्यासाठी त्यांचा हा संप आहे. हे स्कूल बस मालक मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची सोमवारी भेट घेणार आहेत आणि त्यांच्याकडे निवेदन सादर करणार आहेत. स्कूलबससाठी परिवहन विभागाने 23 अटी घातल्या आहेत. त्यातल्या पाच ते सहा अटी पूर्ण करता येणार नाहीत असं या स्कूलबस मालकांचे म्हणणं आहे.

अटी शिथिल करण्यात आल्या नाहीत तर 1 जानेवारीपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय स्कूल बस असोसिएशने घेतला आहे.या संदर्भात चेंबूरच्या आदर्श विद्यालयात एक बैठक पार पडली. त्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीला ठाणे,पुणे आणि मुंबईतील बस मालक हजर होते.परिवहन विभागाने एकूण 23 अटी घातल्या आहेत.

त्यातील 5 ते 6 अटी पूर्ण करणं शक्य नसल्याचा पवित्रा या संघटनेनं घेतला आहे. खिडक्याना 5 सेंटीमिटर वर बाहेरुन लोखंडी रॉड लावणे,15 वर्षच बस चालवणे या अटींच्या विरोधात ही संघटना आहे. या बैठकीत ठाणे आरटीओ विरोधात बसमालकांनी संघटनेकडे तक्रारी केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांशी या तक्रारींबद्दल चर्चा करण्यात येणार असल्याचे असं संघटनेचे अध्यक्ष अनिल गर्गे यांनी सांगितलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 02:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close