S M L

'लोकपाल'साठी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढणार ?

19 डिसेंबरलोकपाल विधेयकासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज रात्री 8 ते 9 च्या दरम्यान बैठक होत आहे. लोकपाल विधेयक बुधवारी संसदेत मांडलं जाणार असून संसदेचं सत्र वाढवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हे सत्र 27 ते 29 डिसेंबरपर्यंत वाढवले जाणार असल्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक याच सत्रात मांडले जावे आणि मंजूरही व्हावे यासाठी अण्णा हजारे यांचा आग्रह आहे. त्यासाठी अधिवेशनाच्या सत्राचा कार्यकाळ वाढवता येईल का याबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सकाळी भाजप नेत्यांची भेट घेतली. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी मुखर्जी यांनी चर्चा केली. आज संध्याकाळी लोकपालावर कॅबिनेटची बैठक होतेय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 09:31 AM IST

'लोकपाल'साठी अधिवेशनाचा कार्यकाळ वाढणार ?

19 डिसेंबर

लोकपाल विधेयकासाठी केंद्रीय मंत्रिमंडळाची आज रात्री 8 ते 9 च्या दरम्यान बैठक होत आहे. लोकपाल विधेयक बुधवारी संसदेत मांडलं जाणार असून संसदेचं सत्र वाढवलं जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. हे सत्र 27 ते 29 डिसेंबरपर्यंत वाढवले जाणार असल्याची शक्यता आहे. लोकपाल विधेयक याच सत्रात मांडले जावे आणि मंजूरही व्हावे यासाठी अण्णा हजारे यांचा आग्रह आहे. त्यासाठी अधिवेशनाच्या सत्राचा कार्यकाळ वाढवता येईल का याबाबत अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी आज सकाळी भाजप नेत्यांची भेट घेतली. लोकसभेतल्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज, राज्यसभेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्याशी मुखर्जी यांनी चर्चा केली. आज संध्याकाळी लोकपालावर कॅबिनेटची बैठक होतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 09:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close