S M L

गणेश कुलकर्णी हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करा !

18 डिसेंबरसोलापूर जिल्ह्याच्या उपळाई खुर्द गावातील उपसरपंच गणेश कुलकर्णी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आता गावकर्‍यांनी उपोषण सुरू केलं आहे. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने या गावकर्‍यांनी नागपूरमध्येच उपोषण सुरू केलं आहे. राजकीय विरोधातून 14 ऑक्टोंबर रोजी गावातील कुलकर्णी यांची हत्या झाली होती. या खून प्रकरणातील आरोपी संदीप पाटीलसह इतर सहका-यांना अटक झाली आहे. मात्र संदीप पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा मतदार संघातील आमदार बबनराव शिंदे यांचा भाचा आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना राजकीय अभय असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. त्यामुळे गणेश कुलकर्णी यांना न्याय मिळावा तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. आरोपींची लवकरात लवकर नार्काेचाचणी करण्यात यावी. आणि या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी..या मागण्यांसाठी उपळाई खुर्द गावातील नागरिक नागपूरमध्ये उपोषणाला बसले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 09:50 AM IST

गणेश कुलकर्णी हत्याप्रकरणाचा तपास सीबीआयमार्फत करा !

18 डिसेंबर

सोलापूर जिल्ह्याच्या उपळाई खुर्द गावातील उपसरपंच गणेश कुलकर्णी यांच्या हत्येची सीबीआय चौकशी करण्याच्या मागणीसाठी आता गावकर्‍यांनी उपोषण सुरू केलं आहे. नागपूर अधिवेशनाच्या निमित्ताने या गावकर्‍यांनी नागपूरमध्येच उपोषण सुरू केलं आहे. राजकीय विरोधातून 14 ऑक्टोंबर रोजी गावातील कुलकर्णी यांची हत्या झाली होती. या खून प्रकरणातील आरोपी संदीप पाटीलसह इतर सहका-यांना अटक झाली आहे. मात्र संदीप पाटील हा राष्ट्रवादी काँग्रेसचा माढा मतदार संघातील आमदार बबनराव शिंदे यांचा भाचा आहे. त्यामुळे या सर्व आरोपींना राजकीय अभय असून गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे असा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. त्यामुळे गणेश कुलकर्णी यांना न्याय मिळावा तसेच या संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी. आरोपींची लवकरात लवकर नार्काेचाचणी करण्यात यावी. आणि या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी..या मागण्यांसाठी उपळाई खुर्द गावातील नागरिक नागपूरमध्ये उपोषणाला बसले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close