S M L

सुपर सीरिजमध्ये सायना पराभूत

18 डिसेंबरभारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ली निंग बॅडमिंटन सुपर सीरिजमध्ये पराभवास सामोरं जावं लागलं आहे. फायनलमध्ये चीनच्या यिहान वांॅगनं सायनाचा 18-21, 21-13, 21-13 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये आघाडी राखणार्‍या सायनाला यिहानने चांगली टक्कर दिली, पण हा गेम सायनाने 18-21 असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये यिहानने सुरेख फटके मारत सायनाला मागे टाकले, सायनानंही या गेममध्ये अनेक चुका केल्या त्याचा फायदा यिहानला झाला आणि दुसरा गेम सायनाला 21-13 असा गमवावा लागला. तिसर्‍या गेममध्ये यिहानने आघाडी कायम राखली आणि गेम 21-13 असा जिंकत विजेतेपद पटकावलं. चीनच्याच झिन वांॅगचा पराभव करून यिहाननं फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 18, 2011 11:48 AM IST

सुपर सीरिजमध्ये सायना पराभूत

18 डिसेंबर

भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालला ली निंग बॅडमिंटन सुपर सीरिजमध्ये पराभवास सामोरं जावं लागलं आहे. फायनलमध्ये चीनच्या यिहान वांॅगनं सायनाचा 18-21, 21-13, 21-13 असा पराभव केला. पहिल्या गेममध्ये आघाडी राखणार्‍या सायनाला यिहानने चांगली टक्कर दिली, पण हा गेम सायनाने 18-21 असा जिंकला. दुसर्‍या गेममध्ये यिहानने सुरेख फटके मारत सायनाला मागे टाकले, सायनानंही या गेममध्ये अनेक चुका केल्या त्याचा फायदा यिहानला झाला आणि दुसरा गेम सायनाला 21-13 असा गमवावा लागला. तिसर्‍या गेममध्ये यिहानने आघाडी कायम राखली आणि गेम 21-13 असा जिंकत विजेतेपद पटकावलं. चीनच्याच झिन वांॅगचा पराभव करून यिहाननं फायनलमध्ये प्रवेश मिळवला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 18, 2011 11:48 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close