S M L

नेत्यांच्या संघटनेना मिळणार्‍या देणगीची चौकशी करा - खडसे

19 डिसेंबरविधानसभेत देणगी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहे. आता छगन भुजबळ यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि गणेश नाईक यांच्या सामाजिक संस्थाना कोट्यवधींची देणगी मिळाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्य उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्या शिवशक्ती संघटनेला ड्राफ्ट आणि चेकने पैसे दिले जातात याची चौकशी करा अशी मागणी खडसे यांनी केली. तसेच संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शहाजी प्रतिष्ठानला इतका मोठा पैसा कुठून आला. एका दिवसात सोळा कोटी कसे जमा झाले याची चौकशी करा अशीही मागणी खडसेंनी केली. या दोन्ही आरोपांसंदर्भात आपण कागदपत्र द्यायला तयार आहोत, त्याची चौकशी सरकारने करावी असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणाले. यावर आरोपांमध्ये तथ्य असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 12:01 PM IST

नेत्यांच्या संघटनेना मिळणार्‍या देणगीची चौकशी करा - खडसे

19 डिसेंबर

विधानसभेत देणगी प्रकरणावरुन विरोधक आक्रमक झाले आहे. आता छगन भुजबळ यांच्यानंतर हर्षवर्धन पाटील आणि गणेश नाईक यांच्या सामाजिक संस्थाना कोट्यवधींची देणगी मिळाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. राज्य उत्पादन शुल्कमंत्री गणेश नाईक यांच्या शिवशक्ती संघटनेला ड्राफ्ट आणि चेकने पैसे दिले जातात याची चौकशी करा अशी मागणी खडसे यांनी केली.

तसेच संसदीय कामकाजमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या शहाजी प्रतिष्ठानला इतका मोठा पैसा कुठून आला. एका दिवसात सोळा कोटी कसे जमा झाले याची चौकशी करा अशीही मागणी खडसेंनी केली. या दोन्ही आरोपांसंदर्भात आपण कागदपत्र द्यायला तयार आहोत, त्याची चौकशी सरकारने करावी असं एकनाथ खडसे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना म्हणाले. यावर आरोपांमध्ये तथ्य असल्यास चौकशी करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 12:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close