S M L

राज्यात 5 टोल नाक्यात 10 हजार कोटींचा घोटाळा - खडसे

19 डिसेंबरराज्यात टोलवसुलीत दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामध्ये एमएसआरडीसी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काही मोठ्या अधिकार्‍यांचा हात आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे,मुंबई एन्ट्री पॉईंट, भिवंडी-कल्याण-शीळफाटा मार्ग, ठाणे-घोडबंदर रस्ता, ठाणे भिवंडी बायपास, धरमतर खाडी पूल, पाताळगंगा नदीवरचा पूल आणि रेल्वे उड्डाण पूल अशा 7 मार्गांवरची टोल वसुली थांबवण्यात येणार नाही, अशी घोषणा सरकारने केली आहे. पण या रस्त्यांच्या बांधकामाचा खर्च वसूल झाला असतानाही पुढच्या 15 वर्षासाठी टोल वसुलीची परवानगी का देण्यात आली ? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला. या घोटाळ्यात एमएसआरडीसी (MSRDC) चे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काही मोठ्या अधिकार्‍यांचा हात आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला. दरम्यान मुंबई एन्ट्री पॉईंटमधे कुठेही घोटाळा झालेला नाही, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकषांनुसारच वसुलीला परवानगी देण्यात आली आहे असा खुलासा जयदत्त क्षीरसागर यांनी केला.'टोल'धाड1.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेप्रकल्पाचा खर्च 2132 कोटी- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली1095 कोटी 89 लाख- टोल वसुलीचा कालावधी30 एप्रिल 20302. मुंबई एन्ट्री पॉईंटप्रकल्पाचा खर्च- 1242 कोटी 52 लाख - 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली1205 कोटी 77 लाख - टोल वसुलीचा कालावधी30 सप्टेंबर 20273. भिवंडी-कल्याण शिळफाटाप्रकल्पाचा खर्च 127 कोटी 34 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली40 कोटी 44 लाख - टोल वसुलीचा कालावधी24 एप्रिल 20134. ठाणे-घोडबंदर रस्ताप्रकल्पाचा खर्च 141 कोटी 31 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली 246 कोटी 46 लाख - टोलवसुलीचा कालावधी31 डिसेंबर 20205. ठाणे-भिवंडी बायपास प्रकल्पाचा खर्च -277 कोटी 44 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली384 कोटी 24 लाख - टोलवसुलीचा कालावधी13 मे 20176. धरमतर खाडी पूल प्रकल्पाचा खर्च 34 कोटी 73 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली15 कोटी 941 लाख- टोलवसुलीचा कालावधी19 नोव्हेंबर 20147. पाताळगंगा पूल आणि रेल्वे फ्लायओव्हरप्रकल्पाचा खर्च 86 कोटी 71 लाख - 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली33 कोटी 30 लाख - टोलवसुलीचा कालावधी2 सप्टेंबर 2015

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 19, 2011 12:11 PM IST

राज्यात 5 टोल नाक्यात 10 हजार कोटींचा घोटाळा - खडसे

19 डिसेंबर

राज्यात टोलवसुलीत दहा हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामध्ये एमएसआरडीसी मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काही मोठ्या अधिकार्‍यांचा हात आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे,मुंबई एन्ट्री पॉईंट, भिवंडी-कल्याण-शीळफाटा मार्ग, ठाणे-घोडबंदर रस्ता, ठाणे भिवंडी बायपास, धरमतर खाडी पूल, पाताळगंगा नदीवरचा पूल आणि रेल्वे उड्डाण पूल अशा 7 मार्गांवरची टोल वसुली थांबवण्यात येणार नाही, अशी घोषणा सरकारने केली आहे.

पण या रस्त्यांच्या बांधकामाचा खर्च वसूल झाला असतानाही पुढच्या 15 वर्षासाठी टोल वसुलीची परवानगी का देण्यात आली ? असा सवाल विरोधकांनी सरकारला विचारला. या घोटाळ्यात एमएसआरडीसी (MSRDC) चे मंत्री जयदत्त क्षीरसागर आणि काही मोठ्या अधिकार्‍यांचा हात आहे असा आरोप विरोधी पक्ष नेते एकनाथ खडसे यांनी केला. दरम्यान मुंबई एन्ट्री पॉईंटमधे कुठेही घोटाळा झालेला नाही, सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टाच्या निकषांनुसारच वसुलीला परवानगी देण्यात आली आहे असा खुलासा जयदत्त क्षीरसागर यांनी केला.

'टोल'धाड

1.मुंबई-पुणे एक्सप्रेस वेप्रकल्पाचा खर्च 2132 कोटी- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली1095 कोटी 89 लाख- टोल वसुलीचा कालावधी30 एप्रिल 20302. मुंबई एन्ट्री पॉईंटप्रकल्पाचा खर्च- 1242 कोटी 52 लाख - 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली1205 कोटी 77 लाख - टोल वसुलीचा कालावधी30 सप्टेंबर 2027

3. भिवंडी-कल्याण शिळफाटाप्रकल्पाचा खर्च 127 कोटी 34 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली40 कोटी 44 लाख - टोल वसुलीचा कालावधी24 एप्रिल 2013

4. ठाणे-घोडबंदर रस्ताप्रकल्पाचा खर्च 141 कोटी 31 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली 246 कोटी 46 लाख - टोलवसुलीचा कालावधी31 डिसेंबर 20205. ठाणे-भिवंडी बायपास प्रकल्पाचा खर्च -277 कोटी 44 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली384 कोटी 24 लाख - टोलवसुलीचा कालावधी13 मे 2017

6. धरमतर खाडी पूल प्रकल्पाचा खर्च 34 कोटी 73 लाख- 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली15 कोटी 941 लाख- टोलवसुलीचा कालावधी19 नोव्हेंबर 2014

7. पाताळगंगा पूल आणि रेल्वे फ्लायओव्हरप्रकल्पाचा खर्च 86 कोटी 71 लाख - 31 मे 2011 पर्यंत टोलवसुली33 कोटी 30 लाख - टोलवसुलीचा कालावधी2 सप्टेंबर 2015

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 19, 2011 12:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close