S M L

डोंबिवलीत पुन्हा दरोडा

20 डिसेंबरडोंबिवलीतल्या दरोड्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांच्या हद्दीतल्या उसरघर गावात काल रात्री हा दरोडा पडला. रतन मडवी यांच्या घरावर हा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी मडवी आणि त्यांची पत्नी राधा यांना मारहाण करून त्यांच्या घरातून 10 तोळे सोनं आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. या दोघांनाही डोंबिवलीच्या आशिर्वाद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. याआधी डोंबिवलीत सारस्वत कॉलनीमध्ये दरोडा पडला होता.त्यावेळी 6 पोलीस कर्मचारी झोपलेले आढळले होते. त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. या कारवाईला अजून एक महिनाही झालेला नाही, तोपर्यंत पुन्हा दरोडा पडला आहे. महिन्याभरातला ही दरोड्याची तिसरी घटना आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 12:08 PM IST

डोंबिवलीत पुन्हा दरोडा

20 डिसेंबर

डोंबिवलीतल्या दरोड्यांचे सत्र अजूनही सुरूच आहे. डोंबिवलीतल्या मानपाडा पोलिसांच्या हद्दीतल्या उसरघर गावात काल रात्री हा दरोडा पडला. रतन मडवी यांच्या घरावर हा दरोडा टाकला. दरोडेखोरांनी मडवी आणि त्यांची पत्नी राधा यांना मारहाण करून त्यांच्या घरातून 10 तोळे सोनं आणि रोख रक्कम घेऊन पळ काढला. या दोघांनाही डोंबिवलीच्या आशिर्वाद हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यात आलं आहे. याआधी डोंबिवलीत सारस्वत कॉलनीमध्ये दरोडा पडला होता.त्यावेळी 6 पोलीस कर्मचारी झोपलेले आढळले होते. त्यांना निलंबितही करण्यात आलं होतं. या कारवाईला अजून एक महिनाही झालेला नाही, तोपर्यंत पुन्हा दरोडा पडला आहे. महिन्याभरातला ही दरोड्याची तिसरी घटना आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 12:08 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close