S M L

स्कूल बसच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल

20 डिसेंबरमहाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी स्कूल बस बंद होत्या. या संपामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी बस स्थानक, आणि रिक्षा स्थानकावर चांगलीच गर्दी झाली होती. पाल्याला शाळेला उशीर होऊ नये म्हणून काहींनी रिक्षा, तर काहींना बेस्टने प्रवास करणे पसंत केलं. मात्र ऐन सकाळी कामावर जाणार नोकर वर्ग आणि शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्यांमुळे बस खच्चाखच भरून गेल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीर झाला. सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस मालकांवर 23 अटी लादल्या आहे. मात्र यातील काही अटीचं मान्य असून इतर अटी मान्य होऊ शकत नाही असं सांगत आज स्कूल बस मालकांनी संप पुकारला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 09:45 AM IST

स्कूल बसच्या संपामुळे विद्यार्थ्यांचे हाल

20 डिसेंबर

महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनने आज एक दिवसाचा संप पुकारला आहे. त्यामुळे आज अनेक ठिकाणी स्कूल बस बंद होत्या. या संपामुळे पालकांची चांगलीच तारांबळ उडाली. आपल्या पाल्याला शाळेत सोडण्यासाठी बस स्थानक, आणि रिक्षा स्थानकावर चांगलीच गर्दी झाली होती. पाल्याला शाळेला उशीर होऊ नये म्हणून काहींनी रिक्षा, तर काहींना बेस्टने प्रवास करणे पसंत केलं. मात्र ऐन सकाळी कामावर जाणार नोकर वर्ग आणि शाळेला जाणार्‍या विद्यार्थ्यांमुळे बस खच्चाखच भरून गेल्या. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत पोहचायला उशीर झाला. सरकारने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी स्कूल बस मालकांवर 23 अटी लादल्या आहे. मात्र यातील काही अटीचं मान्य असून इतर अटी मान्य होऊ शकत नाही असं सांगत आज स्कूल बस मालकांनी संप पुकारला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 09:45 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close