S M L

भगवद्‌गीता राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा - सुषमा स्वराज

20 डिसेंबरभगवद्गीता ग्रंथाविरोधात रशियातल्या एका कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. हा ग्रंथ अतिरेकी साहित्य असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी एक याचिका रशियातल्या एका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी लोकसभेत निवेदन सादर केलं. सरकारने या विषयाला गांभिर्याने घेतलं आहे. रशियाच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं. पण एवढ्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. भगवद्गीतेला राष्ट्रीय पुस्तक म्हणून घोषित करावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तिकडे रशियाच्या अधिकार्‍यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 05:54 PM IST

भगवद्‌गीता राष्ट्रीय ग्रंथ घोषित करा - सुषमा स्वराज

20 डिसेंबर

भगवद्गीता ग्रंथाविरोधात रशियातल्या एका कोर्टात दाखल झालेल्या याचिकेवरुन सध्या वाद निर्माण झाला आहे. हा ग्रंथ अतिरेकी साहित्य असल्याने त्यावर बंदी घालावी, अशी एक याचिका रशियातल्या एका कोर्टात दाखल करण्यात आली आहे. यावरुन आज लोकसभेत गदारोळ झाला. त्यामुळे परराष्ट्र मंत्री एस. एम. कृष्णा यांनी लोकसभेत निवेदन सादर केलं. सरकारने या विषयाला गांभिर्याने घेतलं आहे. रशियाच्या अधिकार्‍यांशी चर्चा सुरु असल्याचे त्यांनी सांगितलं. पण एवढ्यावर विरोधकांचं समाधान झालं नाही. भगवद्गीतेला राष्ट्रीय पुस्तक म्हणून घोषित करावे अशी मागणी विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केली. तिकडे रशियाच्या अधिकार्‍यांनी झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 05:54 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close