S M L

बीकेसी मैदानाचे भाडे रद्द करण्यासाठी IACची मुख्यमंत्र्यांना विनंती

20 डिसेंबर27 तारखेपासून होणारं अण्णा हजारे यांचे आंदोलन मुंबईतल्या एमएमआरडीए ग्राऊंडवर होणार आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं एमएमआरडीएकडे या संदर्भात परवानगी मागितली होती आणि एमएमआरडीएने आंदोलनाला परवानगी दिली आहे. या पटांगणाचा एका दिवसाचा खर्च अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपये असणार आहे. ही रक्कम 10 दिवस आधी भरावी लागणार आहे. पण इतकी रक्कम भरणं कठीण असल्याचे इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेने सांगितले आहे. म्हणूनच हे भाडं रद्द करण्याची किंवा सवलत देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाला गायक आणि संगीतकार विशाल ददलानी मदत करण्यास तयार आहे. एमएमआरडीए मैदानाचा 2 लाख रुपये हा एक दिवसाचा खर्च ददलानी द्यायला तयार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 20, 2011 03:11 PM IST

बीकेसी मैदानाचे भाडे रद्द करण्यासाठी IACची मुख्यमंत्र्यांना विनंती

20 डिसेंबर

27 तारखेपासून होणारं अण्णा हजारे यांचे आंदोलन मुंबईतल्या एमएमआरडीए ग्राऊंडवर होणार आहे. इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेनं एमएमआरडीएकडे या संदर्भात परवानगी मागितली होती आणि एमएमआरडीएने आंदोलनाला परवानगी दिली आहे. या पटांगणाचा एका दिवसाचा खर्च अंदाजे 3 ते 3.5 लाख रुपये असणार आहे. ही रक्कम 10 दिवस आधी भरावी लागणार आहे. पण इतकी रक्कम भरणं कठीण असल्याचे इंडिया अगेन्स्ट करप्शन या संस्थेने सांगितले आहे. म्हणूनच हे भाडं रद्द करण्याची किंवा सवलत देण्याची विनंती त्यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे केली आहे. दरम्यान, अण्णांच्या आंदोलनाला गायक आणि संगीतकार विशाल ददलानी मदत करण्यास तयार आहे. एमएमआरडीए मैदानाचा 2 लाख रुपये हा एक दिवसाचा खर्च ददलानी द्यायला तयार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 20, 2011 03:11 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close