S M L

कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

22 डिसेंबरनाशिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या भावात मोठ्याप्रमाणावर घसरण झाली. या भावामुळे अस्वस्थ होऊन एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. चांदवड तालुक्यातील पुरी गावात ही घटना घडली. साहेबराव केकाणी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. 12 लाख रूपयांचे कर्ज फेडू न शकलं गेल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येतं आहे. काद्यांचे भाव रोखण्यासाठी सरकार काहीही पाऊलं उचलत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता वाढतं आहे. गेल्या आठवड्याभरापासून कांद्याच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. मागील वर्षी डिंसेंबर महिन्यात प्रति क्विंटल 5 हजार रुपये भाव होता. पण यंदाच्या डिसेंबरला कांद्याचा दर आहे फक्त 300 रुपये प्रति क्विंटल. या घसरणीमुळे कांदा मातीमोल भावात शेतकर्‍याला विकावा लागतोय. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला कमीतकमी 2 हजार हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांची मागणी आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2011 11:05 AM IST

कांद्याचे भाव कोसळल्यामुळे शेतकर्‍याचा आत्महत्येचा प्रयत्न

22 डिसेंबर

नाशिक बाजार समितीत गेल्या आठवड्यापासून कांद्याच्या भावात मोठ्याप्रमाणावर घसरण झाली. या भावामुळे अस्वस्थ होऊन एका शेतकर्‍याने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. चांदवड तालुक्यातील पुरी गावात ही घटना घडली. साहेबराव केकाणी असं या शेतकर्‍याचं नाव आहे. 12 लाख रूपयांचे कर्ज फेडू न शकलं गेल्यामुळे आत्महत्येचा प्रयत्न केल्याचं सांगण्यात येतं आहे. काद्यांचे भाव रोखण्यासाठी सरकार काहीही पाऊलं उचलत नसल्याने शेतकर्‍यांमध्ये अस्वस्थता वाढतं आहे.

गेल्या आठवड्याभरापासून कांद्याच्या भावात जोरदार घसरण झाली आहे. मागील वर्षी डिंसेंबर महिन्यात प्रति क्विंटल 5 हजार रुपये भाव होता. पण यंदाच्या डिसेंबरला कांद्याचा दर आहे फक्त 300 रुपये प्रति क्विंटल. या घसरणीमुळे कांदा मातीमोल भावात शेतकर्‍याला विकावा लागतोय. यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍याचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. कांद्याला कमीतकमी 2 हजार हमीभाव मिळावा अशी मागणी शेतकर्‍यांची मागणी आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 11:05 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close