S M L

नियमाचे उल्लंघन करणार्‍या 20 स्कूल बसेसवर RTO ची कारवाई

21 डिसेंबरस्कूल बसेसमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा निषेध म्हणून मनविसेनं नवी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डी. ए. व्ही. शाळेवर याविरोधात मोर्चा काढला होता. तसेच, प्राचार्यांना काळं फासलं होतं. या आंदोलनाची दखल अखेर आर.टी.ओनं घेतली. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या बसेसवर त्यांनी कारवाई केली. तब्बल, 20 बसेसवर कारवाई करण्यात आली. या सर्व बस मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तातडीने, सर्व नियमांची पूर्तता करा, नाहीतर स्कूल बसेसचा परवाना रद्द करू अशी नोटीस बजावण्यात आली. तर परवाना नसणार्‍या 2 बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. पण केवळ नोटीस देऊन थांबू नका, तर या बस चालकावर कडक कारवाई करा,अशी मागणी मनविसेनं केली.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 21, 2011 03:37 PM IST

नियमाचे उल्लंघन करणार्‍या 20 स्कूल बसेसवर RTO ची कारवाई

21 डिसेंबर

स्कूल बसेसमध्ये सुरक्षा नियमांचे पालन होत नसल्याचा निषेध म्हणून मनविसेनं नवी मुंबईत आंदोलन सुरू केलं आहे. नवी मुंबईतल्या नेरुळ इथल्या डी. ए. व्ही. शाळेवर याविरोधात मोर्चा काढला होता. तसेच, प्राचार्यांना काळं फासलं होतं. या आंदोलनाची दखल अखेर आर.टी.ओनं घेतली. सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणार्‍या बसेसवर त्यांनी कारवाई केली. तब्बल, 20 बसेसवर कारवाई करण्यात आली. या सर्व बस मालकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. तातडीने, सर्व नियमांची पूर्तता करा, नाहीतर स्कूल बसेसचा परवाना रद्द करू अशी नोटीस बजावण्यात आली. तर परवाना नसणार्‍या 2 बसेस जप्त करण्यात आल्या आहेत. पण केवळ नोटीस देऊन थांबू नका, तर या बस चालकावर कडक कारवाई करा,अशी मागणी मनविसेनं केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 21, 2011 03:37 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close