S M L

सुनिल तटकरेंविरुध्द विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव

22 डिसेंबरजलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्याविरुध्द विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला.विदर्भाच्या अनुशेषाबद्दल सभागृहात खोटी आकडेवारी सादर केल्याचा आरोप त्यांनी तटकरेंवर केला आहे. विधिमंडळ अधिवेशनात सध्या विदर्भातला जलसिंचन घोटाळा गाजतोय. तसेच विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 22, 2011 04:39 PM IST

सुनिल तटकरेंविरुध्द विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव

22 डिसेंबर

जलसंपदा मंत्री सुनिल तटकरे यांच्याविरुध्द विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव दाखल करण्यात आला आहे. भाजपचे आमदार देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रस्ताव मांडला.विदर्भाच्या अनुशेषाबद्दल सभागृहात खोटी आकडेवारी सादर केल्याचा आरोप त्यांनी तटकरेंवर केला आहे. विधिमंडळ अधिवेशनात सध्या विदर्भातला जलसिंचन घोटाळा गाजतोय. तसेच विदर्भाच्या अनुशेषाच्या मुद्द्यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे. देवेंद्र फडणवीस यांचा हक्कभंगाचा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी दाखल करून घेतला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 22, 2011 04:39 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close