S M L

ठाण्यात अनधिकृत बांधकामावर मुख्यमंत्र्यांची गुगली

23 डिसेंबरठाणे आणि उल्हासनगरातील अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या बिल्डिंगसंदर्भात ठोस निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण अधिवेशन संपताना शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन पटलावर ठेवलं त्यामध्ये ठाणे आणि उल्हासनगर बाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. या संदर्भात ठाण्याच्या इमारतींना चार एफ.एस.आय तर उल्हासनगरातील इमारतींना मुळ बांधकामाइतका एफएसआय दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय आमदारांना दिलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले, पण जेव्हा त्यांच्या हाती मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची प्रत आली त्यात मात्र तज्ज्ञ समिती 1 जानेवारी पर्यंत अहवाल देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं नमूद करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आपली दिशाभूल झाल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी व्यक्त केली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 23, 2011 02:51 PM IST

ठाण्यात अनधिकृत बांधकामावर मुख्यमंत्र्यांची गुगली

23 डिसेंबर

ठाणे आणि उल्हासनगरातील अनधिकृत आणि मोडकळीस आलेल्या बिल्डिंगसंदर्भात ठोस निर्णय घेऊ असं आश्वासन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलं होतं. पण अधिवेशन संपताना शेवटच्या क्षणी मुख्यमंत्र्यांनी जे निवेदन पटलावर ठेवलं त्यामध्ये ठाणे आणि उल्हासनगर बाबत कुठलाही ठोस निर्णय घेतला गेला नाही. या संदर्भात ठाण्याच्या इमारतींना चार एफ.एस.आय तर उल्हासनगरातील इमारतींना मुळ बांधकामाइतका एफएसआय दिला जाईल असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय आमदारांना दिलं होतं. त्यामुळे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषदेत हा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे सांगितले, पण जेव्हा त्यांच्या हाती मुख्यमंत्र्यांच्या निवेदनाची प्रत आली त्यात मात्र तज्ज्ञ समिती 1 जानेवारी पर्यंत अहवाल देईल आणि त्यानंतर निर्णय घेतला जाईल असं नमूद करण्यात आलं. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे आपली दिशाभूल झाल्याची भावना ठाणे जिल्ह्यातील आमदारांनी व्यक्त केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 23, 2011 02:51 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close