S M L

अनधिकृत बांधकामावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक

24 डिसेंबरऔरंगाबादमध्ये अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण हटवणार्‍या पथकावरच नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अनधिकृत प्लॉटवर बांधकाम केलेल्या ठिकाणी 3 दिवसांपासून महापालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटवले जात आहे. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात आज नागरिक रस्त्यावर उतरले आणि अतिक्रमण हटवा पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात 5 पोलीस जखमी झाले असून 4 गाडयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर या परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याने अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2011 12:48 PM IST

अनधिकृत बांधकामावर कारवाईत पोलिसांवर दगडफेक

24 डिसेंबर

औरंगाबादमध्ये अनधिकृत बांधकामाचे अतिक्रमण हटवणार्‍या पथकावरच नागरिकांनी हल्ला केल्याची घटना घडली आहे. मुकुंदवाडी परिसरातील अनधिकृत प्लॉटवर बांधकाम केलेल्या ठिकाणी 3 दिवसांपासून महापालिकेच्या पथकाकडून अतिक्रमण हटवले जात आहे. पालिकेच्या या कारवाईच्या विरोधात आज नागरिक रस्त्यावर उतरले आणि अतिक्रमण हटवा पथक आणि पोलिसांवर दगडफेक केली. यात 5 पोलीस जखमी झाले असून 4 गाडयांची तोडफोड करण्यात आली आहे. त्यानंतर या परिसरामध्ये तणाव निर्माण झाल्याने अधिक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2011 12:48 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close