S M L

टीम अण्णांची मैदानावर तयारी सुरु

24 डिसेंबरअण्णा हजारे यांच्या उपोषणासाठी मुंबईत एमएमआरडीए मैदानावर तयारी सुरू झाली आहे. टीम अण्णांच्या कार्यकर्त्यांनी तसेच मुंबई पोलिसांनी मैदानाची पाहणी केली आहे. एमएमआरडीएचं मैदान सवलतीच्या दरात टीम अण्णांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पाच दिवसांसाठी 7 लाख 78 हजार रुपये भाडं तसेच 5 लाख 39 हजार रुपयांचे डिपॉझिट टीम अण्णांनी भरले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या नावाने हे मैदान बुक करण्यात आलं आहे.संस्था एनजीओ असल्याने सामाजिक कार्यासाठीचे सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. अण्णा 27 तारखेपासून उपोषण करणार आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 24, 2011 12:59 PM IST

टीम अण्णांची मैदानावर तयारी सुरु

24 डिसेंबर

अण्णा हजारे यांच्या उपोषणासाठी मुंबईत एमएमआरडीए मैदानावर तयारी सुरू झाली आहे. टीम अण्णांच्या कार्यकर्त्यांनी तसेच मुंबई पोलिसांनी मैदानाची पाहणी केली आहे. एमएमआरडीएचं मैदान सवलतीच्या दरात टीम अण्णांना उपलब्ध करून देण्यात आलं आहे. पाच दिवसांसाठी 7 लाख 78 हजार रुपये भाडं तसेच 5 लाख 39 हजार रुपयांचे डिपॉझिट टीम अण्णांनी भरले आहे. अरविंद केजरीवाल यांच्या पब्लिक कॉज रिसर्च फाऊंडेशन या संस्थेच्या नावाने हे मैदान बुक करण्यात आलं आहे.संस्था एनजीओ असल्याने सामाजिक कार्यासाठीचे सवलतीचे दर लागू करण्यात आले आहेत. अण्णा 27 तारखेपासून उपोषण करणार आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 24, 2011 12:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close