S M L

'अण्णांच्या आंदोलनादरम्यान सतर्क राहा '

26 डिसेंबरअण्णा हजारे यांचे उद्यापासून आंदोलन सुरू होतं आहे. या आंदोलनादरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून गुप्तचर संस्थांनी काही सूचना केल्या आहेत. यात आंदोलनादरम्यान कोणीही अण्णांना हार घालू नये, उपोषणस्थळी प्लॅस्टिकच्या बॅग आणल्यास त्याची कडक तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच गुजरातमधून येणार्‍या रेल्वे गाड्यांवर नजर ठेवा आणि मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिल्या आहेत. त्याबरोबरच उद्यापासून सुरू होण्यार्‍या अण्णांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची आज बीकेसीत बैठक झाली. सह पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आता मंत्रालयातही याबाबत बैठक होणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2011 09:49 AM IST

'अण्णांच्या आंदोलनादरम्यान सतर्क राहा '

26 डिसेंबर

अण्णा हजारे यांचे उद्यापासून आंदोलन सुरू होतं आहे. या आंदोलनादरम्यान खबरदारीचे उपाय म्हणून गुप्तचर संस्थांनी काही सूचना केल्या आहेत. यात आंदोलनादरम्यान कोणीही अण्णांना हार घालू नये, उपोषणस्थळी प्लॅस्टिकच्या बॅग आणल्यास त्याची कडक तपासणी करण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच गुजरातमधून येणार्‍या रेल्वे गाड्यांवर नजर ठेवा आणि मुंबईतील संवेदनशील ठिकाणांवर लक्ष ठेवण्याच्या सूचना गुप्तचर यंत्रणेनं दिल्या आहेत. त्याबरोबरच उद्यापासून सुरू होण्यार्‍या अण्णांच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांची आज बीकेसीत बैठक झाली. सह पोलीस आयुक्त रजनीश सेठ यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. आता मंत्रालयातही याबाबत बैठक होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2011 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close