S M L

भारतीय बॉलर्सची दादागिरी ; कांगारु 277 रन्स 6 बाद

26 डिसेंबरबॉक्सिंग डे टेस्टचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला आहे. टीम इंडियाने पहिल्याच दिवशी तब्बल 6 विकेट मिळवल्या आहे. पण ऑस्ट्रेलियन टीमनेही जिगरबाज बॅटिंग केली आहे. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 277 रनची मजल मारली आहे. तर भारतासाठी उमेश यादव आणि झहीर खानची कामगिरी आज उजवी ठरली आहे. 29 वर्षांचा एड कॉवनने पहिल्यांदाच बॅगी ग्रीन कॅप डोक्यावर चढवली. आणि लगेचच पॅड्स बांधून तो मैदानात उतरला. कॅप्टन मायकेल क्लार्कने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली होती. कॉवनचा साथीदार डेव्हिड वॉर्नरची बॅट लगेचच बोलायला लागली. फोर आणि सिक्सच्या भाषेतच तो बोलत होता. तेवढ्यात पावसाचा व्यत्यय आला. आणि त्यामुळे भारतीय टीमला विचार करायला थोडा वेळ मिळाला. उमेश यादवने लगेगच भारतीय टीमला दोन विकेट मिळवून दिल्या. आधी वॉर्नर आणि नंतर शॉन मार्शला तर त्याने डकवर आऊट केलं. पाँटिंगचं स्वागत उमेशने केलं ते बाऊन्सरने..पण त्यानंतर पाँटिंग, कॉवन जोडी जमली. आणि दोघांमध्ये पाँटिंगने हाफ सेंच्युरी आधी पूर्ण केली. मागोमाग कॉवनने त्याला गाठलं. दोघांनी 113 रनची पार्टनरशिप केली. पण उमेश यादवनेच ही जोडी फोडली. टी ब्रेकच्या वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता 3 विकेटवर 170 रन.. क्लार्क आणि कॉवनने मग टीमला दोनशे रनचा टप्पा ओलांडून दिला. पण तेवढ्यात झहीरने क्लार्कचा अडथळा दूर केला. आणि पुढच्याच बॉलवर हसीचीही विकेट मिळवली. हॉटस्पॉटवर मात्र बॉल बॅट किंवा ग्लोव्हला लागल्याचं दिसत नव्हतं. हसी नंतर कॉवनची महत्त्वाची विकेट अश्विनला मिळाली. आणि भारतीय टीममध्ये एकच जल्लोष झाला. कॉवनने 68 रन केले. ब्रॅड हॅडिन आणि पीटर सिडल यांनी मग आणखी पडझड होऊ दिली नाही. आणि हाफ सेंच्युरी पार्टनरशिप करत दोघांनी ऑस्ट्रेलियन स्कोअर तीनशेच्या जवळ आणला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2011 04:53 PM IST

भारतीय बॉलर्सची दादागिरी ; कांगारु 277 रन्स 6 बाद

26 डिसेंबर

बॉक्सिंग डे टेस्टचा पहिला दिवस चांगलाच रंगतदार ठरला आहे. टीम इंडियाने पहिल्याच दिवशी तब्बल 6 विकेट मिळवल्या आहे. पण ऑस्ट्रेलियन टीमनेही जिगरबाज बॅटिंग केली आहे. दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने 277 रनची मजल मारली आहे. तर भारतासाठी उमेश यादव आणि झहीर खानची कामगिरी आज उजवी ठरली आहे.

29 वर्षांचा एड कॉवनने पहिल्यांदाच बॅगी ग्रीन कॅप डोक्यावर चढवली. आणि लगेचच पॅड्स बांधून तो मैदानात उतरला. कॅप्टन मायकेल क्लार्कने टॉस जिंकून पहिली बॅटिंग घेतली होती. कॉवनचा साथीदार डेव्हिड वॉर्नरची बॅट लगेचच बोलायला लागली. फोर आणि सिक्सच्या भाषेतच तो बोलत होता. तेवढ्यात पावसाचा व्यत्यय आला. आणि त्यामुळे भारतीय टीमला विचार करायला थोडा वेळ मिळाला. उमेश यादवने लगेगच भारतीय टीमला दोन विकेट मिळवून दिल्या. आधी वॉर्नर आणि नंतर शॉन मार्शला तर त्याने डकवर आऊट केलं. पाँटिंगचं स्वागत उमेशने केलं ते बाऊन्सरने..

पण त्यानंतर पाँटिंग, कॉवन जोडी जमली. आणि दोघांमध्ये पाँटिंगने हाफ सेंच्युरी आधी पूर्ण केली. मागोमाग कॉवनने त्याला गाठलं. दोघांनी 113 रनची पार्टनरशिप केली. पण उमेश यादवनेच ही जोडी फोडली. टी ब्रेकच्या वेळी ऑस्ट्रेलियाचा स्कोअर होता 3 विकेटवर 170 रन.. क्लार्क आणि कॉवनने मग टीमला दोनशे रनचा टप्पा ओलांडून दिला. पण तेवढ्यात झहीरने क्लार्कचा अडथळा दूर केला. आणि पुढच्याच बॉलवर हसीचीही विकेट मिळवली. हॉटस्पॉटवर मात्र बॉल बॅट किंवा ग्लोव्हला लागल्याचं दिसत नव्हतं. हसी नंतर कॉवनची महत्त्वाची विकेट अश्विनला मिळाली. आणि भारतीय टीममध्ये एकच जल्लोष झाला. कॉवनने 68 रन केले. ब्रॅड हॅडिन आणि पीटर सिडल यांनी मग आणखी पडझड होऊ दिली नाही. आणि हाफ सेंच्युरी पार्टनरशिप करत दोघांनी ऑस्ट्रेलियन स्कोअर तीनशेच्या जवळ आणला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2011 04:53 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close