S M L

अण्णांच्या आंदोलनाला कडकोट सुरक्षा

26 डिसेंबरअण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईत एमएमआरडीए मैदानावर होतंय आणि आजपर्यंत कुठल्याही आंदोलनाला पुरवली नाही अशी सुरक्षा व्यवस्था अण्णांच्या या आंदोलनासाठी तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस, एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, ऍम्ब्युलंस अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही ऍलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर बॉलीवुडच्या स्टार्सना सुरक्षा पुरवणारे बाऊंसर अण्णांच्याही दिमतीला असतील. एकूण आठ बाऊंसर्स अहोरात्र अण्णांच्या सुरक्षेसाठी असतील. तसेच आंदोलनासाठी मुंबईसुद्धा सज्ज आहे. टीम अण्णांचे सदस्य किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली. अण्णा उद्या जूहू चौपाटीवर जाऊन गांधी पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते मिठीबाई- विले पार्ले मार्गे वांद्रे कुर्ला संकुलात पोहोचतील. त्यानंतर ते मैदानात येतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 26, 2011 04:55 PM IST

अण्णांच्या आंदोलनाला कडकोट सुरक्षा

26 डिसेंबर

अण्णा हजारे यांचे उपोषण मुंबईत एमएमआरडीए मैदानावर होतंय आणि आजपर्यंत कुठल्याही आंदोलनाला पुरवली नाही अशी सुरक्षा व्यवस्था अण्णांच्या या आंदोलनासाठी तैनात करण्यात आली आहे. महाराष्ट्र पोलीस, एसआरपीएफ, शीघ्र कृती दल, बॉम्ब शोधक पथक, अग्निशमन दल, ऍम्ब्युलंस अशी जय्यत तयारी करण्यात आली आहे. गुप्तचर यंत्रणांनीही ऍलर्ट जारी केला आहे. एवढंच नाही तर बॉलीवुडच्या स्टार्सना सुरक्षा पुरवणारे बाऊंसर अण्णांच्याही दिमतीला असतील. एकूण आठ बाऊंसर्स अहोरात्र अण्णांच्या सुरक्षेसाठी असतील. तसेच आंदोलनासाठी मुंबईसुद्धा सज्ज आहे. टीम अण्णांचे सदस्य किरण बेदी, अरविंद केजरीवाल आणि मनिष सिसोदिया यांनी मैदानावर जाऊन पाहणी केली. अण्णा उद्या जूहू चौपाटीवर जाऊन गांधी पुतळ्याला अभिवादन करतील आणि त्यानंतर ते मिठीबाई- विले पार्ले मार्गे वांद्रे कुर्ला संकुलात पोहोचतील. त्यानंतर ते मैदानात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 26, 2011 04:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close