S M L

लोकपालवर झालेल्या चर्चेचा आढावा

27 डिसेंबरऐतिहासिक लोकपाल विधेयकावर संसदेत सकाळी 11 वाजून 38 मिनिट... लोकपालवर चर्चेला सुरुवात झाली. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी अतिशय तावातावतच या चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सुरुवातीला नारायणसामी यांच्या आक्रमतेचा समाचार घेत सरकारी लोकपालवर कडाडून हल्ला चढवला. सक्षम लोकपालाची मागणी करणार्‍या भाजपने राज्यावर लोकायुक्त लादणे हे मात्र संघराज्य पद्धतीत हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. लोकपाल निवड समितीत अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यालाही विरोध केला.या मुद्द्यावरून सुषमा स्वराज आणि लालूप्रसाद यादव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. भाजपने सरकारी लोकपालमध्ये एकूण 13 दुरुस्त्या सुचवल्या... या दुरुस्त्या मान्य करा किंवा विधेयक स्थायी समितीकडे परत पाठवा अशी आग्रही मागणी सुषमा स्वराज यांनी केली. स्वराजांच्या भाषणाला सडेतोड उत्तर देत त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केला. विधेयक आणलं नाही तर जनता आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.शिवसेनेच्या अनंत गीते यांनी लोकपाल या संस्थेलाच कडाडून विरोध केला. पंतप्रधानांवर अंकुश ठेवणारा लोकपाल अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गीते यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सीपीएम नेते संदीप आचार्य यांनीही सरकारी लोकपाल विधेयकात दुरुस्त्या सुचवल्या. कॉर्पोरेट क्षेत्र लोकपालच्या कक्षेत यायलाच हवं, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांच्या चर्चेला उत्तर देताना राजकारण बाजूला ठेवून विचार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. पण पंतप्रधानांनी यूपीए सरकारने केलेल्या विकासकामांचा दाखला देत संसदेतच इलेक्शन कार्ड वापरल्याचा घणाघाती आरोप सीपीआयचे खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी केला. यानंतर लालू प्रसाद यादव यांचं त्यांच्या नेहमीच्या शैलीतलं भाषण झालं. लोकपाल विधेयकापेक्षा टीम अण्णांवरच त्यांनी टीका केली. पण लोकपालवर अण्णा आणि त्यांच्या टीमला मिळत असलेल्या पाठिंब्याला आपण नाकारू शकत नसल्याचं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 27, 2011 04:47 PM IST

लोकपालवर झालेल्या चर्चेचा आढावा

27 डिसेंबर

ऐतिहासिक लोकपाल विधेयकावर संसदेत सकाळी 11 वाजून 38 मिनिट... लोकपालवर चर्चेला सुरुवात झाली. पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणसामी यांनी अतिशय तावातावतच या चर्चेला सुरुवात केली. त्यानंतर विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी सुरुवातीला नारायणसामी यांच्या आक्रमतेचा समाचार घेत सरकारी लोकपालवर कडाडून हल्ला चढवला. सक्षम लोकपालाची मागणी करणार्‍या भाजपने राज्यावर लोकायुक्त लादणे हे मात्र संघराज्य पद्धतीत हस्तक्षेप असल्याचा आरोप केला. लोकपाल निवड समितीत अल्पसंख्याकांना आरक्षण देण्यालाही विरोध केला.

या मुद्द्यावरून सुषमा स्वराज आणि लालूप्रसाद यादव यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. भाजपने सरकारी लोकपालमध्ये एकूण 13 दुरुस्त्या सुचवल्या... या दुरुस्त्या मान्य करा किंवा विधेयक स्थायी समितीकडे परत पाठवा अशी आग्रही मागणी सुषमा स्वराज यांनी केली. स्वराजांच्या भाषणाला सडेतोड उत्तर देत त्यांचे मुद्दे खोडून काढण्याचा प्रयत्न दूरसंचार मंत्री कपिल सिब्बल यांनी केला. विधेयक आणलं नाही तर जनता आपल्याला माफ करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

शिवसेनेच्या अनंत गीते यांनी लोकपाल या संस्थेलाच कडाडून विरोध केला. पंतप्रधानांवर अंकुश ठेवणारा लोकपाल अमान्य असल्याचं त्यांनी सांगितलं.राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गीते यांच्या भूमिकेला पाठिंबा दिला. सीपीएम नेते संदीप आचार्य यांनीही सरकारी लोकपाल विधेयकात दुरुस्त्या सुचवल्या. कॉर्पोरेट क्षेत्र लोकपालच्या कक्षेत यायलाच हवं, अशी मागणी त्यांनी केली. विरोधकांच्या चर्चेला उत्तर देताना राजकारण बाजूला ठेवून विचार करावा, असं आवाहन पंतप्रधानांनी केलं.

पण पंतप्रधानांनी यूपीए सरकारने केलेल्या विकासकामांचा दाखला देत संसदेतच इलेक्शन कार्ड वापरल्याचा घणाघाती आरोप सीपीआयचे खासदार गुरुदास दासगुप्ता यांनी केला. यानंतर लालू प्रसाद यादव यांचं त्यांच्या नेहमीच्या शैलीतलं भाषण झालं. लोकपाल विधेयकापेक्षा टीम अण्णांवरच त्यांनी टीका केली. पण लोकपालवर अण्णा आणि त्यांच्या टीमला मिळत असलेल्या पाठिंब्याला आपण नाकारू शकत नसल्याचं यशवंत सिन्हा यांनी म्हटलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 27, 2011 04:47 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close