S M L

मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव

29 डिसेंबरभारतीय टीमच्या ऑस्ट्रलिया दौर्‍याची सुरुवात अखेर पराभवानेच झाली. पहिल्या मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा 122 रननी पराभव झाला. टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 240 रनमध्ये संपली. आणि भारतीय टीमसमोर विजयासाठी 282 रनचं आव्हान होतं. पण सिमिंग विकेटवर भारताची बॅटिंग लाईन अप गडबडली. अख्खी टीम 169 रनवरच ऑलआऊट झाली. सचिनचे 32 रन हा दुसर्‍या इनिंगमधला हायएस्ट स्कोअर ठरला. सचिनच्या खालोखाल अश्विनने 30 रन केले. बाकी बॅट्समन फक्त हजेरी लावून परतले. इनिंगमध्ये एकही पार्टनरशिप झाली नाही. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली. कालपर्यंत ज्या टेस्टमध्ये भारतीय टीमला विजयाची संधी होती, तीच टेस्ट टीमने आज 122 रननी गमावली. विजयासाठी 292 रनचं आव्हान समोर असताना भारताची दुसरी इनिंग 169 रनमध्येच कोसळली. त्यामुळे सीरिजमध्येही टीम 0-1ने पिछाडीवर पडलीय. चौथा दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या आठ विकेट गेल्या असताना कॅप्टन धोणीची भूमिका बचावात्मक होती. बॅट्समनना सिंगल्स आरामात मिळत होत्या. त्यामुळे माईक हसी आणि पॅटिनसन यांना चौथ्या दिवशीही सुरुवात मिळाली. झहीरने माईक हसीला हुशारीने आऊट केलं खरं, पण तोपर्यंत त्याने 89 रन केले होते. त्यापुढची डोकेदुखी म्हणजे तळाच्या दोन बॅट्समननी 43 रन जोडले. ईशांतने हिल्फेनहाऊसला आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाची इनिंग 240 रनमध्ये संपली. भारतासमोर आता आव्हान होतं 292 रनचं. पण भारताची सुरुवातच खराब झाली. सेहवाग सहाव्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर तर विकेटची रांगच लागली. गंभीर सलग दुसर्‍यांदा अपयशी ठरला. सचिनचं प्रेक्षकांकडून आजही स्वागत झालं. त्याने काही देखणे शॉटही मारले. पण दुसर्‍या बाजूने त्याचे दोन जुने साथीदार त्याला सोडून गेले. द्रविड दहा रनवर बोल्ड झाला, तर लक्ष्मणने जेमतम भोपळा फोडला. त्यातच विराट कोहली डकवर एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि परिस्थिती आणखीनच बिघडली. सचिनवरही त्याचं दडपण आलं असावं. सिडलच्या एका अप्रतिम बॉलवर तोही आऊट झाला आणि टीमची अवस्था सहा विकेटवर 81 अशी बिकट झाली. धोणी आणि अश्विनने टीमचा स्कोअर निदान शंभरच्या वर नेला. पण हा प्रतिकारही फार टिकणारा नव्हताच. आणि अश्विन, झहीर, धोणी आऊट झाल्यावर भारतीय इनिंगही संपली. ऑस्ट्रेलियाचा 122 रननी विजय झाला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2011 09:50 AM IST

मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा दारुण पराभव

29 डिसेंबर

भारतीय टीमच्या ऑस्ट्रलिया दौर्‍याची सुरुवात अखेर पराभवानेच झाली. पहिल्या मेलबर्न टेस्टमध्ये भारताचा 122 रननी पराभव झाला. टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंग 240 रनमध्ये संपली. आणि भारतीय टीमसमोर विजयासाठी 282 रनचं आव्हान होतं. पण सिमिंग विकेटवर भारताची बॅटिंग लाईन अप गडबडली. अख्खी टीम 169 रनवरच ऑलआऊट झाली.

सचिनचे 32 रन हा दुसर्‍या इनिंगमधला हायएस्ट स्कोअर ठरला. सचिनच्या खालोखाल अश्विनने 30 रन केले. बाकी बॅट्समन फक्त हजेरी लावून परतले. इनिंगमध्ये एकही पार्टनरशिप झाली नाही. या विजयाबरोबरच ऑस्ट्रेलियाने सीरिजमध्ये 1-0 अशी महत्त्वपूर्ण आघाडी घेतली.

कालपर्यंत ज्या टेस्टमध्ये भारतीय टीमला विजयाची संधी होती, तीच टेस्ट टीमने आज 122 रननी गमावली. विजयासाठी 292 रनचं आव्हान समोर असताना भारताची दुसरी इनिंग 169 रनमध्येच कोसळली. त्यामुळे सीरिजमध्येही टीम 0-1ने पिछाडीवर पडलीय. चौथा दिवसाचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या आठ विकेट गेल्या असताना कॅप्टन धोणीची भूमिका बचावात्मक होती. बॅट्समनना सिंगल्स आरामात मिळत होत्या. त्यामुळे माईक हसी आणि पॅटिनसन यांना चौथ्या दिवशीही सुरुवात मिळाली.

झहीरने माईक हसीला हुशारीने आऊट केलं खरं, पण तोपर्यंत त्याने 89 रन केले होते. त्यापुढची डोकेदुखी म्हणजे तळाच्या दोन बॅट्समननी 43 रन जोडले. ईशांतने हिल्फेनहाऊसला आऊट केलं आणि ऑस्ट्रेलियाची इनिंग 240 रनमध्ये संपली. भारतासमोर आता आव्हान होतं 292 रनचं.

पण भारताची सुरुवातच खराब झाली. सेहवाग सहाव्याच ओव्हरमध्ये आऊट झाला. त्यानंतर तर विकेटची रांगच लागली. गंभीर सलग दुसर्‍यांदा अपयशी ठरला. सचिनचं प्रेक्षकांकडून आजही स्वागत झालं. त्याने काही देखणे शॉटही मारले. पण दुसर्‍या बाजूने त्याचे दोन जुने साथीदार त्याला सोडून गेले. द्रविड दहा रनवर बोल्ड झाला, तर लक्ष्मणने जेमतम भोपळा फोडला. त्यातच विराट कोहली डकवर एलबीडब्ल्यू आऊट झाला आणि परिस्थिती आणखीनच बिघडली.

सचिनवरही त्याचं दडपण आलं असावं. सिडलच्या एका अप्रतिम बॉलवर तोही आऊट झाला आणि टीमची अवस्था सहा विकेटवर 81 अशी बिकट झाली. धोणी आणि अश्विनने टीमचा स्कोअर निदान शंभरच्या वर नेला. पण हा प्रतिकारही फार टिकणारा नव्हताच. आणि अश्विन, झहीर, धोणी आऊट झाल्यावर भारतीय इनिंगही संपली. ऑस्ट्रेलियाचा 122 रननी विजय झाला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2011 09:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close