S M L

भाजपचा खरा चेहरा उघड - सोनिया गांधी

28 डिसेंबरकाल मंगळवारी बहुचर्चित बहुप्रतीक्षित लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झालं. पण घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यात सरकारला अपयश आलं. याचं खापर भाजपवर फोडायला सरकारने सुरुवात केली आहे. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचे भाजपने मान्य केलं होतं पण ऐनवेळी भाजपने पलटी मारली, त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलाय अशी टीका सोनिया गांधींनी भाजपवर केलेली आहे. काल लोकसभेत आवाजी मतदानाने अगोदर लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा देण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र 2/3 बहुमत मिळू न शकल्यामुळे लोकपालला घटनात्मक दर्जा दिला गेला नाही. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी भाजपवर टीका केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विरोधकांची इच्छा नाही त्यामुळे आजचा दिवस हा संसदेसाठी अत्यंत वाईट दिवस होता अशा शब्दात प्रणवदांनी आपला संताप व्यक्त केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2011 08:31 AM IST

भाजपचा खरा चेहरा उघड - सोनिया गांधी

28 डिसेंबर

काल मंगळवारी बहुचर्चित बहुप्रतीक्षित लोकपाल विधेयक लोकसभेत मंजूर झालं. पण घटना दुरुस्ती विधेयक संमत करण्यात सरकारला अपयश आलं. याचं खापर भाजपवर फोडायला सरकारने सुरुवात केली आहे. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचे भाजपने मान्य केलं होतं पण ऐनवेळी भाजपने पलटी मारली, त्यामुळे भाजपचा खरा चेहरा आता लोकांसमोर आलाय अशी टीका सोनिया गांधींनी भाजपवर केलेली आहे. काल लोकसभेत आवाजी मतदानाने अगोदर लोकपाल विधेयकाला घटनात्मक दर्जा देण्याचे मंजूर करण्यात आले होते मात्र 2/3 बहुमत मिळू न शकल्यामुळे लोकपालला घटनात्मक दर्जा दिला गेला नाही. यावेळी प्रणव मुखर्जी यांनी भाजपवर टीका केली. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचा विरोधकांची इच्छा नाही त्यामुळे आजचा दिवस हा संसदेसाठी अत्यंत वाईट दिवस होता अशा शब्दात प्रणवदांनी आपला संताप व्यक्त केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2011 08:31 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close