S M L

मेलबर्न टेस्टच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 15 गडी बाद

28 डिसेंबरमेलबर्न टेस्टच्या तिसर्‍या दिवशी तब्बल पंधरा विकेट गेल्या. आणि त्यामुळे टेस्टमध्ये जबरदस्त रंगत निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन टीमकडे आता 230 रनची आघाडी आहे. पण त्यांच्या दोनच विकेट बाकी आहेत. भारतीय टीमसाठी तिसर्‍या दिवसाची सुरुवात खराब झाली. जम बसलेला राहुल द्रविड सुरुवातीलाच आऊट झाला. कालच्या स्कोअरमध्ये एकाही रनची भर न घालता तो 68 रनवर पॅव्हेलिअनमध्ये परतला. स्कोअर तेव्हा होता चार विकेटवर 214 रन....पण काही मिनिटातच तो झाला 245 रनवर सात विकेट...मिडल ऑर्डरने हिल्फेनहाऊस आणि सिडलसमोर नांगी टाकली. लक्ष्मण, धोणी, कोहली हे सगळे झटपट आऊट झाले. ईशांत शर्माला आऊट करत हिल्फेनहाऊसने आपली पाचवी विकेट घेतली. टेस्टमध्ये पाच विकेट घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ. अश्विनने 3 फोर आणि एक सिक्स मारत 31 रन केले. पण तो आऊट झाल्यावर भारतीय इनिंग संपली आणि ऑस्ट्रेलियाला 51 रनची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंगही अडखळत सुरु झाली. उमेश यादवने टॉप ऑर्डर उध्वस्त केली. वॉर्नर, कॉवन आणि मार्श या विकेट त्याने मिळवल्या. तर ईशांत शर्माने मायकेल क्लार्कला आऊट केलं. आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था चार विकेटवर 27 रन अशी झाली. पण यानंतर रिकी पाँटिंग आणि मायकेल हसीने मग ऑसी इनिंग सावरली. दोघांनी दोन तास किल्ला लढवला. आणि टी ब्रेकपर्यंत त्यांच्याकडे 136 रनची आघाडी होती. दोघांनी आपली हाफ सेंच्युरीही पूर्ण केली. अखेर झहीर खानने ही जोडी फोडली. पाँटिंगला 60 आणि पाठोपाठ हॅडिनला 6 रनवर आऊट केलं. हसीला स्लिपमध्ये द्रविडने जीवदान दिलं. पण उमेश यादवने दुसर्‍या बाजूने पीटर सिडलला आऊट केलं. दिवस संपता संपता अश्विनने आणखी एक विकेट मिळवली. आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था दिवसअखेर झाली आठ विकेटवर 179 रन्स...मॅचचे आणखी दोन दिवस बाकी असून चौथा दिवस निर्णायक ठरणार हे नक्की..

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 28, 2011 01:29 PM IST

मेलबर्न टेस्टच्या तिसर्‍या दिवशी तब्बल 15 गडी बाद

28 डिसेंबर

मेलबर्न टेस्टच्या तिसर्‍या दिवशी तब्बल पंधरा विकेट गेल्या. आणि त्यामुळे टेस्टमध्ये जबरदस्त रंगत निर्माण झाली आहे. ऑस्ट्रेलियन टीमकडे आता 230 रनची आघाडी आहे. पण त्यांच्या दोनच विकेट बाकी आहेत. भारतीय टीमसाठी तिसर्‍या दिवसाची सुरुवात खराब झाली. जम बसलेला राहुल द्रविड सुरुवातीलाच आऊट झाला. कालच्या स्कोअरमध्ये एकाही रनची भर न घालता तो 68 रनवर पॅव्हेलिअनमध्ये परतला.

स्कोअर तेव्हा होता चार विकेटवर 214 रन....पण काही मिनिटातच तो झाला 245 रनवर सात विकेट...मिडल ऑर्डरने हिल्फेनहाऊस आणि सिडलसमोर नांगी टाकली. लक्ष्मण, धोणी, कोहली हे सगळे झटपट आऊट झाले. ईशांत शर्माला आऊट करत हिल्फेनहाऊसने आपली पाचवी विकेट घेतली. टेस्टमध्ये पाच विकेट घेण्याची त्याची ही पहिलीच वेळ. अश्विनने 3 फोर आणि एक सिक्स मारत 31 रन केले. पण तो आऊट झाल्यावर भारतीय इनिंग संपली आणि ऑस्ट्रेलियाला 51 रनची आघाडी मिळाली. ऑस्ट्रेलियाची दुसरी इनिंगही अडखळत सुरु झाली. उमेश यादवने टॉप ऑर्डर उध्वस्त केली. वॉर्नर, कॉवन आणि मार्श या विकेट त्याने मिळवल्या. तर ईशांत शर्माने मायकेल क्लार्कला आऊट केलं. आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था चार विकेटवर 27 रन अशी झाली.

पण यानंतर रिकी पाँटिंग आणि मायकेल हसीने मग ऑसी इनिंग सावरली. दोघांनी दोन तास किल्ला लढवला. आणि टी ब्रेकपर्यंत त्यांच्याकडे 136 रनची आघाडी होती. दोघांनी आपली हाफ सेंच्युरीही पूर्ण केली. अखेर झहीर खानने ही जोडी फोडली. पाँटिंगला 60 आणि पाठोपाठ हॅडिनला 6 रनवर आऊट केलं. हसीला स्लिपमध्ये द्रविडने जीवदान दिलं. पण उमेश यादवने दुसर्‍या बाजूने पीटर सिडलला आऊट केलं. दिवस संपता संपता अश्विनने आणखी एक विकेट मिळवली. आणि ऑस्ट्रेलियाची अवस्था दिवसअखेर झाली आठ विकेटवर 179 रन्स...मॅचचे आणखी दोन दिवस बाकी असून चौथा दिवस निर्णायक ठरणार हे नक्की..

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 28, 2011 01:29 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close