S M L

सरकारी लोकपाल मागे घ्या - जेटली

29 डिसेंबर सरकार जर कुचकामी, कुठलंही प्रभाव नसलेलं पोकळ लोकपाल विधेयक आणत असेल, तर त्याला भाजपचा कडाडून विरोध आहे असं सांगत भाजपच्या अरुण जेटलींनी आज राज्यसभेत तोफ डागली. नारायण स्वामी यांनी लोकपाल विधेयक सादर केल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. अरुण जेटलींनी सक्षम लोकपालासाठी सूचवलेल्या दुरुस्त्या, त्यासाठी मांडलेले घटनात्मक मुद्दे आणि कायद्याचा आधार प्रभाव मांडणारा होता. त्याचबरोबर लोकायुक्तांचे अधिकार, संघराज्यांमध्ये हस्तक्षेप आणि भाजपने लावून धरलेला आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी आग्रहीपणे मांडला. त्यांना उत्तर देताना, सरकारच्या वतीन अभिषेक मनू सिंघवीनी अनेक मुद्दे खोडून तर काढलेच, शिवाय विरोधकांचीच हे विधेयक पास करण्याची इच्छा नाही असा प्रतिहल्लाही चढवला. कनिष्ठ नोकरशाही आणि वरिष्ठ सनदी अधिकारी यात काही फरक करणार की नाही असं विचारत त्यांनीही कायद्याचे दाखले दिले. शिवाय काही तांत्रिक दुरुस्त्या करण्याची तयारीही दाखवली. कलगीतुरा तर रंगतोय,आता सामना कोण जिंकतो, हे महत्त्वाचं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 29, 2011 09:18 AM IST

सरकारी लोकपाल मागे घ्या - जेटली

29 डिसेंबर

सरकार जर कुचकामी, कुठलंही प्रभाव नसलेलं पोकळ लोकपाल विधेयक आणत असेल, तर त्याला भाजपचा कडाडून विरोध आहे असं सांगत भाजपच्या अरुण जेटलींनी आज राज्यसभेत तोफ डागली. नारायण स्वामी यांनी लोकपाल विधेयक सादर केल्यानंतर चर्चेला सुरुवात झाली. अरुण जेटलींनी सक्षम लोकपालासाठी सूचवलेल्या दुरुस्त्या, त्यासाठी मांडलेले घटनात्मक मुद्दे आणि कायद्याचा आधार प्रभाव मांडणारा होता.

त्याचबरोबर लोकायुक्तांचे अधिकार, संघराज्यांमध्ये हस्तक्षेप आणि भाजपने लावून धरलेला आरक्षणाचा मुद्दाही त्यांनी आग्रहीपणे मांडला. त्यांना उत्तर देताना, सरकारच्या वतीन अभिषेक मनू सिंघवीनी अनेक मुद्दे खोडून तर काढलेच, शिवाय विरोधकांचीच हे विधेयक पास करण्याची इच्छा नाही असा प्रतिहल्लाही चढवला. कनिष्ठ नोकरशाही आणि वरिष्ठ सनदी अधिकारी यात काही फरक करणार की नाही असं विचारत त्यांनीही कायद्याचे दाखले दिले. शिवाय काही तांत्रिक दुरुस्त्या करण्याची तयारीही दाखवली. कलगीतुरा तर रंगतोय,आता सामना कोण जिंकतो, हे महत्त्वाचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2011 09:18 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close