S M L

' सरकारनं केलं लोकशाहीचं वस्त्रहरण '

30 जानेवारी, नवी दिल्लीराज्यसभेतल्या कालच्या लाजिरवाण्या नाट्यानंतर आता लोकपालवरून राजकीय पक्षांचा ब्लेम गेम सुरू झाला आहे. आणि या सगळ्यात गेल्या 43 वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वाच्या लोकपाल बिलाची मात्र कोंडीच होत चालली आहे.राज्यसभेतल्या गुरुवारच्या नाट्यानंतर आज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. सकाळी संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता भाजपनंही पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. लोकपाल बिल पास होऊ न देणं हे सरकराचं षड्‌यंत्र असल्याचा आरोप भाजपचे राज्यसक्षेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केला. तर पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जी यांनी मिळून हा कट केला होता असा आरोप लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. घटक पक्षच सरकारविरोधी आहेत, तर मग विरोधकांना कशाला दोष देता असा थेट सवालही अरुण जेटली यांनी केला आहे. विधेयकावर मतदानापासून पळ काढणा-या सरकारला एक क्षणही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलंय. तर राहुल गांधी यांनी भाजपवरच आरोप केलाय. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचं फक्त माझंच नाही तर संपूर्ण तरूणाईचं स्वप्नं होतं. मात्र हे स्वप्नं भाजपमुळे भंगलंय, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी केला. राज्यसभेत भाजपमुळेच लोकपाल बिल पास होऊ शकलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Dec 30, 2011 02:14 PM IST

' सरकारनं केलं लोकशाहीचं वस्त्रहरण '

30 जानेवारी, नवी दिल्ली

राज्यसभेतल्या कालच्या लाजिरवाण्या नाट्यानंतर आता लोकपालवरून राजकीय पक्षांचा ब्लेम गेम सुरू झाला आहे. आणि या सगळ्यात गेल्या 43 वर्षांपासून रखडलेल्या महत्त्वाच्या लोकपाल बिलाची मात्र कोंडीच होत चालली आहे.

राज्यसभेतल्या गुरुवारच्या नाट्यानंतर आज आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरूच आहेत. सकाळी संसदीय कामकाज मंत्री पवनकुमार बन्सल यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यानंतर आता भाजपनंही पत्रकार परिषद घेऊन सरकारवर हल्ला चढवला. लोकपाल बिल पास होऊ न देणं हे सरकराचं षड्‌यंत्र असल्याचा आरोप भाजपचे राज्यसक्षेतले विरोधी पक्षनेते अरूण जेटली यांनी केला. तर पंतप्रधान आणि प्रणव मुखर्जी यांनी मिळून हा कट केला होता असा आरोप लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्या सुषमा स्वराज यांनी केला. घटक पक्षच सरकारविरोधी आहेत, तर मग विरोधकांना कशाला दोष देता असा थेट सवालही अरुण जेटली यांनी केला आहे. विधेयकावर मतदानापासून पळ काढणा-या सरकारला एक क्षणही सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, असं त्यांनी म्हटलंय.

तर राहुल गांधी यांनी भाजपवरच आरोप केलाय. लोकपालला घटनात्मक दर्जा देण्याचं फक्त माझंच नाही तर संपूर्ण तरूणाईचं स्वप्नं होतं. मात्र हे स्वप्नं भाजपमुळे भंगलंय, असा आरोप काँग्रेसचे सरचिटणीस राहुल गांधींनी केला. राज्यसभेत भाजपमुळेच लोकपाल बिल पास होऊ शकलं नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 30, 2011 02:14 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close