S M L

अण्णा समर्थकांनी दाखवले पंतप्रधानांना काळे झेंडे

01 जानेवारीनविन वर्षाचं सगळीकडे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी नविन वर्षाचा पहिला दिवस मात्र खास चांगला ठरलेला नाही. अण्णा हजारेंच्या समर्थकांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. पंतप्रधान अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा अण्णा हजारेंच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. लोकपाल बिलाबाबत सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही याबद्दलचा संताप या आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार्‍यांनी ते भाजपच्या नेत्यांना दाखवावेत, कारण त्यांच्यामुळे लोकपाल विधेयक पास होेऊ शकलेलं नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्यानी दिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2012 09:07 AM IST

अण्णा समर्थकांनी दाखवले पंतप्रधानांना काळे झेंडे

01 जानेवारी

नविन वर्षाचं सगळीकडे जल्लोषात स्वागत करण्यात आलं आहे. पण पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासाठी नविन वर्षाचा पहिला दिवस मात्र खास चांगला ठरलेला नाही. अण्णा हजारेंच्या समर्थकांनी पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवून त्यांचा निषेध केला. पंतप्रधान अमृतसरच्या सुवर्णमंदिरात दर्शनासाठी आले होते. तेव्हा अण्णा हजारेंच्या समर्थकांनी त्यांना काळे झेंडे दाखवले. लोकपाल बिलाबाबत सरकारने दिलेलं आश्वासन पाळलं नाही याबद्दलचा संताप या आंदोलकांनी व्यक्त केला. दरम्यान पंतप्रधानांना काळे झेंडे दाखवणार्‍यांनी ते भाजपच्या नेत्यांना दाखवावेत, कारण त्यांच्यामुळे लोकपाल विधेयक पास होेऊ शकलेलं नाही. अशी प्रतिक्रिया काँग्रेसच्या प्रवक्त्यानी दिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2012 09:07 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close