S M L

अनुजचे आई-वडील अजूनही मृतदेहाच्या प्रतिक्षेत

01 जानेवारीइंग्लंडमध्ये हत्या झालेल्या अनुज बिडवेच्या हत्याकांडाला पाच दिवस लोटले आहे. पण अनुजचे आई-वडीलांना अजूनही अनुजचा मृतदेह मिळालेला नाही. यूके पोलिसांचं एक पथक उद्या त्याच्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. दरम्यान, अनुजचा मृतदेह आणण्यासाठी मंगळवारी अजुनचे आई-वडील आणि मेव्हणे इंग्लंडला जाणार आहेत. अनुजच्या मारेकर्‍याबद्दल अधिक माहिती देणार्‍यांना 50 हजार पाऊंडचे बक्षीस युके पोलिसांनी जाहीर केलं आहे. युके पोलीस अनुजच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर मारेकर्‍यांचा शोध घेत आहे. आतापर्यंत या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. त्यातल्या अटकेत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना जामीन मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अनुजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मृतदेह लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन दिलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 1, 2012 11:40 AM IST

अनुजचे आई-वडील अजूनही मृतदेहाच्या प्रतिक्षेत

01 जानेवारी

इंग्लंडमध्ये हत्या झालेल्या अनुज बिडवेच्या हत्याकांडाला पाच दिवस लोटले आहे. पण अनुजचे आई-वडीलांना अजूनही अनुजचा मृतदेह मिळालेला नाही. यूके पोलिसांचं एक पथक उद्या त्याच्या आई-वडीलांची भेट घेणार आहे. दरम्यान, अनुजचा मृतदेह आणण्यासाठी मंगळवारी अजुनचे आई-वडील आणि मेव्हणे इंग्लंडला जाणार आहेत. अनुजच्या मारेकर्‍याबद्दल अधिक माहिती देणार्‍यांना 50 हजार पाऊंडचे बक्षीस युके पोलिसांनी जाहीर केलं आहे. युके पोलीस अनुजच्या हत्येत सहभागी असलेल्या इतर मारेकर्‍यांचा शोध घेत आहे. आतापर्यंत या प्रकरणी 5 जणांना अटक करण्यात आली. त्यातल्या अटकेत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांना जामीन मिळाला आहे. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीही अनुजच्या कुटुंबीयांची भेट घेऊन मृतदेह लवकरात लवकर कसा मिळेल यासाठी प्रयत्न करु असं आश्वासन दिलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 1, 2012 11:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close