S M L

बिग बींची केबीसीसाठी होती 100 कोटी फी ?

02 जानेवारीअमिताभ बच्चन यांनी पंचकोटी महामणी म्हणत यावर्षी छोट्या पडद्यावरती केबीसीमधून पुन्हा एकदा प्रवेश केला. टीव्ही जगतातला हा लोकप्रिय शो बिग बींच्या आगमनामुळे अजूनच प्रकाशझोतात आला. पण यावर्षीचं केबीसीमधलं अजून एक हाईलाईट होतं ते म्हणजे पाच कोटी रुपये. या शोच्या विजेत्याची रक्कम पाच कोटी एवढी करण्यात आली होती. त्यामुळे हॉटसीटवर बसून बिग बीं समोर खेळण्याची मजा द्विगुणीत झाली होती. आता अशी खबर आहे की, सोनी टीव्हीने अमिताभ बच्चन यांना पुढील तीन सीझन्ससाठी करारबध्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अशी ऑफर बिग बींना लवकरच करण्यात येणार आहे. 2012 च्या ऑगस्ट महिन्यात हा सिलसिला पुन्हा एकदा सुरु होईल. यावेळच्या सीझनसाठी बीग बींना 100 कोटी देण्यात आले होते अशी चर्चा होती. तर तीन सीझन्स करण्यासाठी किती कोटी दिले जात आहेत याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 02:03 PM IST

बिग बींची केबीसीसाठी होती 100 कोटी फी ?

02 जानेवारी

अमिताभ बच्चन यांनी पंचकोटी महामणी म्हणत यावर्षी छोट्या पडद्यावरती केबीसीमधून पुन्हा एकदा प्रवेश केला. टीव्ही जगतातला हा लोकप्रिय शो बिग बींच्या आगमनामुळे अजूनच प्रकाशझोतात आला. पण यावर्षीचं केबीसीमधलं अजून एक हाईलाईट होतं ते म्हणजे पाच कोटी रुपये. या शोच्या विजेत्याची रक्कम पाच कोटी एवढी करण्यात आली होती. त्यामुळे हॉटसीटवर बसून बिग बीं समोर खेळण्याची मजा द्विगुणीत झाली होती. आता अशी खबर आहे की, सोनी टीव्हीने अमिताभ बच्चन यांना पुढील तीन सीझन्ससाठी करारबध्द करण्याचा निर्णय घेतला आहे आणि अशी ऑफर बिग बींना लवकरच करण्यात येणार आहे. 2012 च्या ऑगस्ट महिन्यात हा सिलसिला पुन्हा एकदा सुरु होईल. यावेळच्या सीझनसाठी बीग बींना 100 कोटी देण्यात आले होते अशी चर्चा होती. तर तीन सीझन्स करण्यासाठी किती कोटी दिले जात आहेत याची सगळ्यांना उत्सुकता लागली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 02:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close