S M L

निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा पाऊस

02 जानेवारीमहापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने आज घोषणांचा पाऊस पाडला. 1 जानेवारी 1995 पर्यंतच्या झोपड्यांना यापूर्वीच संरक्षण देण्यात आलं होतं. आतापर्यंत या तारखेपर्यंत त्या झोपडपट्‌ट्यात राहणारे रहिवासी पुनर्वसनासाठी पात्र होते. पण आता 1 जानेवारी 1995 नंतर या झोपड्यांमध्ये राहायला आलेल्या रहिवाशांनाही मालकी हक्क मिळणार आहे. मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच सध्याच्या जे. जे. हॉस्पिटलला एम्सचा दर्जा देण्याचाही महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हॉस्पिटलच्या मागच्याच बाजूला एक अल्ट्रा मॉडर्न सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे नवीन जे. जे. हॉस्पिटल 20 मजली असेल. त्यासाठी 629 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.मंत्रिमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय काय आहेत ?- मोठ्या भूखंडांमधली 20%जागा परवडणार्‍या घरांसाठी राखीव ठेवणं बिल्डरांना बंधनकारक- धान्य हमी योजना राबवून घरपोच धान्यवाटप करण्याचा निर्णय - अल्पसंख्याक महिलांसाठी 1600 बचत गटांना मंजुरी- मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये प्रत्येकी एक सरकारी हॉस्पिटल उभारणार- मुंबईसह राज्यात 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापणार- मुंबई, अलिबाग, नंदूरबार आणि सातार्‍यात ही हॉस्पिटल उभारणार

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 2, 2012 06:20 PM IST

निवडणुकांच्या तोंडावर घोषणांचा पाऊस

02 जानेवारी

महापालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन राज्य सरकारने आज घोषणांचा पाऊस पाडला. 1 जानेवारी 1995 पर्यंतच्या झोपड्यांना यापूर्वीच संरक्षण देण्यात आलं होतं. आतापर्यंत या तारखेपर्यंत त्या झोपडपट्‌ट्यात राहणारे रहिवासी पुनर्वसनासाठी पात्र होते. पण आता 1 जानेवारी 1995 नंतर या झोपड्यांमध्ये राहायला आलेल्या रहिवाशांनाही मालकी हक्क मिळणार आहे. मंत्रिमंडळाची आज बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यासोबतच सध्याच्या जे. जे. हॉस्पिटलला एम्सचा दर्जा देण्याचाही महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हॉस्पिटलच्या मागच्याच बाजूला एक अल्ट्रा मॉडर्न सुपर स्पेशॅलिटी हॉस्पिटल उभारण्यात येणार आहे. हे नवीन जे. जे. हॉस्पिटल 20 मजली असेल. त्यासाठी 629 कोटी रुपयांचा खर्च येणार असल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.

मंत्रिमंडळातील इतर महत्त्वाचे निर्णय काय आहेत ?

- मोठ्या भूखंडांमधली 20%जागा परवडणार्‍या घरांसाठी राखीव ठेवणं बिल्डरांना बंधनकारक- धान्य हमी योजना राबवून घरपोच धान्यवाटप करण्याचा निर्णय - अल्पसंख्याक महिलांसाठी 1600 बचत गटांना मंजुरी- मुंबईच्या पश्चिम आणि पूर्व उपनगरामध्ये प्रत्येकी एक सरकारी हॉस्पिटल उभारणार- मुंबईसह राज्यात 4 नवीन वैद्यकीय महाविद्यालयं स्थापणार- मुंबई, अलिबाग, नंदूरबार आणि सातार्‍यात ही हॉस्पिटल उभारणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 2, 2012 06:20 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close