S M L

मँचेस्टर पोलिसांनी घेतली दुसर्‍यांदा बिडवे कुटुंबीयांची भेट

03 जानेवारीमँचेस्टर पोलिसांनी आज पुन्हा एकदा अनुज बिडवेच्या आईवडलांची पुण्यात भेट घेतली. अनुजच्या हत्या प्रकरणातल्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असं आश्‍वासन त्यांनी अनुजच्या कुटुंबीयांना दिलं. अनुजचं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय आज रात्री किंवा उद्या इंग्लंडला जाणार आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दलही पोलीस अधिकार्‍यांनी चर्चा केली. अनुजच्या पाथिर्वाचे आज दुसर्‍यांदा पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. थोड्याच वेळात अनुजचं पार्थिव भारतीय हाय कमिशनच्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर ते पार्थिव लंडनला पाठवल जाणार आहे. तिथं ते अनुजच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं जाईल. दरम्यान, अनुजच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कायरन स्टेपलटन नावाच्या तरुणाला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अनुजला श्रद्धांजली वाहण्यासाठी काल मँचेस्टरमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मँचेस्टरमधले भारतीय विद्यार्थी सहभागी झाले होते. मँचेस्टरच्या नागरिकांनीही अनुजला श्रद्धांजली वाहिली.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 3, 2012 10:50 AM IST

मँचेस्टर पोलिसांनी घेतली दुसर्‍यांदा बिडवे कुटुंबीयांची भेट

03 जानेवारी

मँचेस्टर पोलिसांनी आज पुन्हा एकदा अनुज बिडवेच्या आईवडलांची पुण्यात भेट घेतली. अनुजच्या हत्या प्रकरणातल्या दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जाणार नाही, असं आश्‍वासन त्यांनी अनुजच्या कुटुंबीयांना दिलं. अनुजचं पार्थिव ताब्यात घेण्यासाठी त्याचे कुटुंबीय आज रात्री किंवा उद्या इंग्लंडला जाणार आहेत. त्यांच्या या प्रवासाबद्दलही पोलीस अधिकार्‍यांनी चर्चा केली. अनुजच्या पाथिर्वाचे आज दुसर्‍यांदा पोस्टमॉर्टेम करण्यात आलं. थोड्याच वेळात अनुजचं पार्थिव भारतीय हाय कमिशनच्या ताब्यात दिलं जाणार आहे. त्यानंतर ते पार्थिव लंडनला पाठवल जाणार आहे. तिथं ते अनुजच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दिलं जाईल. दरम्यान, अनुजच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या कायरन स्टेपलटन नावाच्या तरुणाला 20 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. तर अनुजला श्रद्धांजली वाहण्यासाठी काल मँचेस्टरमध्ये कँडल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये मँचेस्टरमधले भारतीय विद्यार्थी सहभागी झाले होते. मँचेस्टरच्या नागरिकांनीही अनुजला श्रद्धांजली वाहिली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 3, 2012 10:50 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close