S M L

कांद्याला अडीच रुपये किलो मातीमोल भाव

04 जानेवारीनाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहे. शेतकर्‍यांना अडीच रुपये किलो या मातीमोल भावाने कांदा विकावा लागत आहेत. त्यातून कांद्याचा उत्पादन खर्च तर दूर पण शेतकर्‍याला बाजारातून घरी परत जाण्याचा प्रवास खर्च देखील निघत नाही. कांद्याची निर्यात आणि किमान निर्यात दर याबाबत केंद्र सरकारने घातलेल्या गोंधळामुळे ही परिस्थीती उद्भवल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. वाढीव निर्यात दरामुळे कांद्याच्या निर्यातीत 50 टक्के घट झाली आहे. परिणामी शेतकर्‍याला कांदा अडीच रुपयाने विकावा लागतोय.पण दुसरीकडे ग्राहकांना मात्र हाच कांदा किरकोळ बाजारात 12 ते 15 रुपये दरानं खरेदी करावा लागतोय.एकीकडे कांद्याचे भाव घसरलेत पण किरकोळ बाजारात कांदा चढ्या दरानं मिळतोय. मुंबई - 16 रुपये प्रतिकिलोठाणे - 12 रुपये प्रतिकिलोनाशिक शहर - 10 रुपये प्रतिकिलोपुणे - 10 ते 12 रुपये प्रतिकिलोनागपूर - 10 ते 12 रुपये प्रतिकिलोऔरंगाबाद - 8 ते 10 रुपये प्रतिकिलोरत्नागिरी - 8 ते 10 रुपये प्रतिकिलोकोल्हापूर - 12 रुपये प्रतिकिलोजळगांव - 10 रुपये प्रतिकिलो

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 09:49 AM IST

कांद्याला अडीच रुपये किलो मातीमोल भाव

04 जानेवारी

नाशिकच्या घाऊक बाजारात कांद्याचे भाव प्रचंड कोसळले आहे. शेतकर्‍यांना अडीच रुपये किलो या मातीमोल भावाने कांदा विकावा लागत आहेत. त्यातून कांद्याचा उत्पादन खर्च तर दूर पण शेतकर्‍याला बाजारातून घरी परत जाण्याचा प्रवास खर्च देखील निघत नाही. कांद्याची निर्यात आणि किमान निर्यात दर याबाबत केंद्र सरकारने घातलेल्या गोंधळामुळे ही परिस्थीती उद्भवल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. वाढीव निर्यात दरामुळे कांद्याच्या निर्यातीत 50 टक्के घट झाली आहे. परिणामी शेतकर्‍याला कांदा अडीच रुपयाने विकावा लागतोय.पण दुसरीकडे ग्राहकांना मात्र हाच कांदा किरकोळ बाजारात 12 ते 15 रुपये दरानं खरेदी करावा लागतोय.

एकीकडे कांद्याचे भाव घसरलेत पण किरकोळ बाजारात कांदा चढ्या दरानं मिळतोय.

मुंबई - 16 रुपये प्रतिकिलोठाणे - 12 रुपये प्रतिकिलोनाशिक शहर - 10 रुपये प्रतिकिलोपुणे - 10 ते 12 रुपये प्रतिकिलोनागपूर - 10 ते 12 रुपये प्रतिकिलोऔरंगाबाद - 8 ते 10 रुपये प्रतिकिलोरत्नागिरी - 8 ते 10 रुपये प्रतिकिलोकोल्हापूर - 12 रुपये प्रतिकिलोजळगांव - 10 रुपये प्रतिकिलो

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 09:49 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close