S M L

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार

04 जानेवारीमहापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आज मुंबईत झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पण पुण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. 10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातलं आहे. या निवडणुकांसंदर्भात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. सुनील तटकरे यांच्या मेघदूत या बंगल्यावर ही बैठक झाली. काल मंगळवारीच अजितदादा पवार यांनी जाहीरनामा प्रसिध्द करुन स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. शहरात भरघोस विकास केल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला. तसेच सुरेश कलमाडी तुरूंगात असल्याने पुण्यात काँग्रेस कमजोर अवस्थेत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. आता काँग्रेसची खिंडीत सापडलेल्या अवस्थेत राष्ट्रवादी आपला विजयी झेंडा रोवेल का ? हे निकालातच स्पष्ट होई.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 05:55 PM IST

पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढणार

04 जानेवारी

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक महत्त्वाची बैठक आज मुंबईत झाली. पिंपरी-चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला आहे. पण पुण्याबाबत अजूनही निर्णय झालेला नाही. 10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातलं आहे. या निवडणुकांसंदर्भात शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेतली. सुनील तटकरे यांच्या मेघदूत या बंगल्यावर ही बैठक झाली. काल मंगळवारीच अजितदादा पवार यांनी जाहीरनामा प्रसिध्द करुन स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते. शहरात भरघोस विकास केल्याचा दावा राष्ट्रवादीनं केला. तसेच सुरेश कलमाडी तुरूंगात असल्याने पुण्यात काँग्रेस कमजोर अवस्थेत आहे. त्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने आक्रमक झाल्याचं दिसतं आहे. आता काँग्रेसची खिंडीत सापडलेल्या अवस्थेत राष्ट्रवादी आपला विजयी झेंडा रोवेल का ? हे निकालातच स्पष्ट होई.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 05:55 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close