S M L

शरद पवारांनी बोलावली आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

04 जानेवारी10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातलं आहे. या निवडणुकांसंदर्भात आज संध्याकाळी7:30 वाजता शरद पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकांबाबतची रणनीती ठरवली जाईल, तसेच मंत्र्यांच्या स्थानिक कामगिरीचा आढावा घेऊन काही संभाव्य फेरबदलांचे संकेत या बैठकीतून पवार मंत्र्यांना देऊ शकतात.पवारांच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होणार ?1. 27 पैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवायची.2. पॅनलवाईज निवडणुकांमध्ये कशापद्धतीनं स्थानिक आघाड्या उभारायच्या, बेरजेचं राजकारण कसं करायचं याचे धडे खुद्द शरद पवार मंत्र्यांना देतील.3. महापालिकांमधील शहरी मतदारापर्यंत सरकारचे निर्णय कसे पोहोचवायचे यावर चर्चा 4. मुंबई आणि ठाण्यात आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. 5. आघाडी होत असेल तर राष्ट्रवादीला किती जागा परवडतील यावरही चर्चा होईल. 6. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढताना रणनीती काय ठेवावी यावर चर्चा होणार.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 11:25 AM IST

शरद पवारांनी बोलावली आज राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक

04 जानेवारी

10 महापालिका आणि 27 जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये खुद्द शरद पवार यांनीच लक्ष घातलं आहे. या निवडणुकांसंदर्भात आज संध्याकाळी7:30 वाजता शरद पवार मुंबईत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत निवडणुकांबाबतची रणनीती ठरवली जाईल, तसेच मंत्र्यांच्या स्थानिक कामगिरीचा आढावा घेऊन काही संभाव्य फेरबदलांचे संकेत या बैठकीतून पवार मंत्र्यांना देऊ शकतात.

पवारांच्या या बैठकीत नेमका काय निर्णय होणार ?1. 27 पैकी निम्म्याहून अधिक ठिकाणी राष्ट्रवादीची सत्ता कायम ठेवायची.2. पॅनलवाईज निवडणुकांमध्ये कशापद्धतीनं स्थानिक आघाड्या उभारायच्या, बेरजेचं राजकारण कसं करायचं याचे धडे खुद्द शरद पवार मंत्र्यांना देतील.3. महापालिकांमधील शहरी मतदारापर्यंत सरकारचे निर्णय कसे पोहोचवायचे यावर चर्चा 4. मुंबई आणि ठाण्यात आघाडी करायची की नाही याचा अंतिम निर्णय शरद पवार घेतील. 5. आघाडी होत असेल तर राष्ट्रवादीला किती जागा परवडतील यावरही चर्चा होईल. 6. पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काँग्रेसच्या विरोधात लढताना रणनीती काय ठेवावी यावर चर्चा होणार.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 11:25 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close