S M L

ऑस्ट्रेलियाची 659 रन्सवर इनिंग घोषित

05 जानेवारीसिडनी टेस्टच्या तिसर्‍या दिवशी भारतीय टीम जवळ जवळ पराभवाच्या वाटेवर आहे. मायकेल क्लार्कच्या ट्रिपल सेंच्युरीनंतर ऑस्ट्रेलियाने आपली पहिली इनिंग 4 विकेटवर 659 रन्सवर घोषित केली. आणि दिवसअखेर भारतीय टीमनेही 2 विकेटवर 114 रन्स केले आहेत. पण भारतासाठी हा स्टार्ट काही खास स्टार्ट नाही. तिसर्‍या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मूळातच 291 रनची आघाडी होती. टेस्टवर त्यांचं वर्चस्व होतंच. भारतीय बॉलर्सनी आदल्या दिवशीच मान टाकली होती. त्यामुळे क्लार्क आणि हसीला रन लुटण्यात कसलीच अडचण नव्हती. हसीने आरामात आपली सोळावी सेंच्युरी पूर्ण केली. लंचपूर्वी मायकेल क्लार्कनेही दोन माईलस्टोन गाठले. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरचा हायएस्ट स्कोअर ठोकला. तर ऑस्ट्रेलियन कॅप्टनने ऑस्ट्रेलियात केलेलाही हा हायएस्ट स्कोअर होता. ईशांत शर्माच्या एका बॉलवर फोर मारतच त्याने आपली ट्रिपल सेंच्युरी पूर्ण केली. ट्रिपल सेंच्युरी करणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन बॅट्समन ठरला. तर भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा बॅट्समन...स्कोअर वाढत होता. त्यामुळे नवीन रेकॉर्ड होतच राहिले. एकाच इनिंगमध्ये अडीचशेपेक्षा जास्त रनच्या दोन पार्टनरशिप झाल्या. आणि आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये असं पहिल्यांदाच घडलं. हसीने आपले दीडशे रन पूर्ण केले. पण सगळ्यांना क्लार्कच्या चारशे रनची प्रतीक्षा असताना अनपेक्षितपणे क्लार्कने इनिंग घोषित केली. ऑस्ट्रेलियाकडे तेव्हा 468 रनची आघाडी होती. भारतीय टीमसाठी चांगली सुरुवात अत्यावश्यक होती. पण सेहवागचा खराब फॉर्म इथंही आडवा आला. डेव्हिड वॉर्नरने एक अप्रतिम कॅच पकडत त्याची इनिंग 4 रनवर संपवली. गौतम गंभीर मात्र दुसर्‍या बाजूने चांगले शॉट खेळत होता. मॅच बघायला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड जातीने स्टेडिअमवर हजर होत्या. टीब्रेकच्या वेळी भारताचा स्कोअर होता एक विकेटवर 53 रन...तिसर्‍या सेशनमध्ये गंभीरने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. द्रविडच्या साहय्याने स्कोअरही त्याने सेंच्युरीच्या पार नेला. पण तेवढ्यात द्रविड 29 रनवर आऊट झाला. सीरिजमध्ये तिसर्‍यांदा तो क्लीनबोल्ड झाला. सचिन तेंडुलकरही एकदा आऊट होता होता वाचला. पण नशिबाने एकदा त्याला साथ दिलीय. आता गंभीरच्या साथीने मोठी पार्टनरशिप त्याला करावी लागेल.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 09:51 AM IST

ऑस्ट्रेलियाची 659 रन्सवर इनिंग घोषित

05 जानेवारी

सिडनी टेस्टच्या तिसर्‍या दिवशी भारतीय टीम जवळ जवळ पराभवाच्या वाटेवर आहे. मायकेल क्लार्कच्या ट्रिपल सेंच्युरीनंतर ऑस्ट्रेलियाने आपली पहिली इनिंग 4 विकेटवर 659 रन्सवर घोषित केली. आणि दिवसअखेर भारतीय टीमनेही 2 विकेटवर 114 रन्स केले आहेत. पण भारतासाठी हा स्टार्ट काही खास स्टार्ट नाही.

तिसर्‍या दिवशीचा खेळ सुरु झाला तेव्हा ऑस्ट्रेलियाकडे मूळातच 291 रनची आघाडी होती. टेस्टवर त्यांचं वर्चस्व होतंच. भारतीय बॉलर्सनी आदल्या दिवशीच मान टाकली होती. त्यामुळे क्लार्क आणि हसीला रन लुटण्यात कसलीच अडचण नव्हती. हसीने आरामात आपली सोळावी सेंच्युरी पूर्ण केली. लंचपूर्वी मायकेल क्लार्कनेही दोन माईलस्टोन गाठले. सिडनी क्रिकेट ग्राऊंडवरचा हायएस्ट स्कोअर ठोकला. तर ऑस्ट्रेलियन कॅप्टनने ऑस्ट्रेलियात केलेलाही हा हायएस्ट स्कोअर होता.

ईशांत शर्माच्या एका बॉलवर फोर मारतच त्याने आपली ट्रिपल सेंच्युरी पूर्ण केली. ट्रिपल सेंच्युरी करणारा तो सहावा ऑस्ट्रेलियन बॅट्समन ठरला. तर भारताविरुद्ध अशी कामगिरी करणारा तिसरा बॅट्समन...स्कोअर वाढत होता. त्यामुळे नवीन रेकॉर्ड होतच राहिले. एकाच इनिंगमध्ये अडीचशेपेक्षा जास्त रनच्या दोन पार्टनरशिप झाल्या. आणि आंतरराष्ट्रीय टेस्टमध्ये असं पहिल्यांदाच घडलं. हसीने आपले दीडशे रन पूर्ण केले. पण सगळ्यांना क्लार्कच्या चारशे रनची प्रतीक्षा असताना अनपेक्षितपणे क्लार्कने इनिंग घोषित केली.

ऑस्ट्रेलियाकडे तेव्हा 468 रनची आघाडी होती. भारतीय टीमसाठी चांगली सुरुवात अत्यावश्यक होती. पण सेहवागचा खराब फॉर्म इथंही आडवा आला. डेव्हिड वॉर्नरने एक अप्रतिम कॅच पकडत त्याची इनिंग 4 रनवर संपवली. गौतम गंभीर मात्र दुसर्‍या बाजूने चांगले शॉट खेळत होता. मॅच बघायला ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधान ज्युलिया गिलार्ड जातीने स्टेडिअमवर हजर होत्या. टीब्रेकच्या वेळी भारताचा स्कोअर होता एक विकेटवर 53 रन...

तिसर्‍या सेशनमध्ये गंभीरने आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. द्रविडच्या साहय्याने स्कोअरही त्याने सेंच्युरीच्या पार नेला. पण तेवढ्यात द्रविड 29 रनवर आऊट झाला. सीरिजमध्ये तिसर्‍यांदा तो क्लीनबोल्ड झाला. सचिन तेंडुलकरही एकदा आऊट होता होता वाचला. पण नशिबाने एकदा त्याला साथ दिलीय. आता गंभीरच्या साथीने मोठी पार्टनरशिप त्याला करावी लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 09:51 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close