S M L

भंवरी देवी हत्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

04 जानेवारीराजस्थानात गाजलेल्या भंवरी देवी हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात सीबीआयला अखेर यश आलं आहे. भंवरी देवीचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिली. याप्रकरणी एका आरोपीला आज महाराष्ट्रातल्या लोणावळ्यातून अटक करण्यात आली. बिश्ना राम असं या आरोपीचं नाव आहे. भंवरी देवीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍या गँगचा तो प्रमुख आहे. पुण्यातल्या शिवाजी नगर कोर्टाने बिश्ना रामला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली. या प्रकरणात भंवरीच्या नवर्‍याचाही हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भंवरीच्या अपहरणसाठी त्याला 10 लाख रुपए देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. एवढंच नाही तर राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि काँग्रेसचे आमदार मलखान सिंग या दोघांनी या हत्येचा कट रचल्याची माहितीही मिळतेय. हे दोघंही सध्या अटकेत आहेत.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 10:39 AM IST

भंवरी देवी हत्याप्रकरणी पुण्यातून एकाला अटक

04 जानेवारी

राजस्थानात गाजलेल्या भंवरी देवी हत्या प्रकरणाचा गुंता सोडवण्यात सीबीआयला अखेर यश आलं आहे. भंवरी देवीचं अपहरण करुन हत्या करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी आयबीएन नेटवर्कला दिली. याप्रकरणी एका आरोपीला आज महाराष्ट्रातल्या लोणावळ्यातून अटक करण्यात आली. बिश्ना राम असं या आरोपीचं नाव आहे. भंवरी देवीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावणार्‍या गँगचा तो प्रमुख आहे. पुण्यातल्या शिवाजी नगर कोर्टाने बिश्ना रामला दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड दिली. या प्रकरणात भंवरीच्या नवर्‍याचाही हात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भंवरीच्या अपहरणसाठी त्याला 10 लाख रुपए देण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. एवढंच नाही तर राजस्थानचे माजी मंत्री महिपाल मदेरणा आणि काँग्रेसचे आमदार मलखान सिंग या दोघांनी या हत्येचा कट रचल्याची माहितीही मिळतेय. हे दोघंही सध्या अटकेत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 10:39 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close