S M L

कंपनी स्थलांतराच्या विरोधात कामगाराचे 7 दिवसांपासून उपोषण सुरु

05 जानेवारीपिंपरी चिंचवड मधील ड्युक कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. कंपनीने प्लांट शिफ्टिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप 360 कामगारांनी केला आहे. उपोषणकर्त्या 8 कामगारांची तब्येत आता गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. ड्युक कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाकडून पिंपरी येथील प्लांट कर्नाटकामधल्या बेळगाव मध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाकडून सर्व कामगारांना बेळगाव मधील प्लांट मध्ये शिफ्ट व्हायला सांगण्यात आलं. पण याला कामगारांचा विरोध आहे. तर कंपनीने महिनाभरात नुकसान भरपाई देणार असल्याचं सांगितले आहे. ड्युक कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काही कर्मचारी जेव्हा बेळगावच्या प्लंाटच्या ठिकाणी गेले...पण त्यंाना तिथे प्लंाट ऐवजी फक्त एक शेड दिसली. बेळगाव मध्ये शिफ्ट केलेल्या प्लांट मध्ये एकही यंत्र लागलं नसताना काम सुरू कसं करायचं ? आणि काम नसेल तर कंपनी कामगारंाना कुठून पगार देणार ? असा प्रश्न कामगारांना पडला आहे. बेळगाव मधल्या प्लांटएवजी ड्युक कंपनीच्याच भिमा - कोरेगावच्या प्लांट मध्ये काम द्यावं अशी मागणी कामगार करत आहे. कंपनी व्यवस्थापन मात्र कामगारांशी बोलायला तयार नाही. कामगाराच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या कामगारांनी दिला आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 11:15 AM IST

कंपनी स्थलांतराच्या विरोधात कामगाराचे 7 दिवसांपासून उपोषण सुरु

05 जानेवारी

पिंपरी चिंचवड मधील ड्युक कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या कामगारांच्या उपोषणाचा आज 7 वा दिवस आहे. कंपनीने प्लांट शिफ्टिंगच्या नावाखाली फसवणूक केल्याचा आरोप 360 कामगारांनी केला आहे. उपोषणकर्त्या 8 कामगारांची तब्येत आता गंभीर झाल्याने त्यांना उपचारासाठी ससून रुग्णालयात हलविण्यात आलं आहे. ड्युक कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाकडून पिंपरी येथील प्लांट कर्नाटकामधल्या बेळगाव मध्ये शिफ्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला. कंपनीच्या व्यवस्थापक मंडळाकडून सर्व कामगारांना बेळगाव मधील प्लांट मध्ये शिफ्ट व्हायला सांगण्यात आलं. पण याला कामगारांचा विरोध आहे. तर कंपनीने महिनाभरात नुकसान भरपाई देणार असल्याचं सांगितले आहे.

ड्युक कार्पोरेशन प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे काही कर्मचारी जेव्हा बेळगावच्या प्लंाटच्या ठिकाणी गेले...पण त्यंाना तिथे प्लंाट ऐवजी फक्त एक शेड दिसली. बेळगाव मध्ये शिफ्ट केलेल्या प्लांट मध्ये एकही यंत्र लागलं नसताना काम सुरू कसं करायचं ? आणि काम नसेल तर कंपनी कामगारंाना कुठून पगार देणार ? असा प्रश्न कामगारांना पडला आहे. बेळगाव मधल्या प्लांटएवजी ड्युक कंपनीच्याच भिमा - कोरेगावच्या प्लांट मध्ये काम द्यावं अशी मागणी कामगार करत आहे. कंपनी व्यवस्थापन मात्र कामगारांशी बोलायला तयार नाही. कामगाराच्या मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन आणखी तीव्र करणार असल्याचा इशारा आंदोलनकर्त्या कामगारांनी दिला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 11:15 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close