S M L

मुलं चोरण्याचा संशय घेऊन दोघांची निघृण हत्या

04 जानेवारीठाणे जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. इथे वाट चुकलेल्या दोन ड्रायव्हर्सना गावकर्‍यांनी बेदम मारहाण करत ठार केलं. होंडा सिटी आणि इनोव्हा या दोन गाड्या संध्याकाळी उशिरा बोईसरमधल्या गुंडले गावात शिरल्या. वाट चुकल्यामुळे हे दोन ड्रायव्हर या गावात आले. पण हे लोक लहान मुलांना चोरण्यासाठी आल्याचा संशय गावकर्‍यांना आला आणि त्यामुळेच गावकर्‍यांनी फावड्‌यासारख्या अवजारांनी त्या दोघांवर हल्ला चढवला. दोघांना इतकी मारहाण करण्यात आली की त्यात त्यांचा जीव गेला. हे दोघं मुंबईतले राहणारे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बोईसर भागात लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरलीय. त्यामुळे गावात रात्री पहाराही दिला जातो. पण मुलं चोरीचा असा कुठलाही प्रकार याआधी घडला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण या अफवेमुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 4, 2012 05:59 PM IST

मुलं चोरण्याचा संशय घेऊन दोघांची निघृण हत्या

04 जानेवारी

ठाणे जिल्ह्यातल्या बोईसरमध्ये एक अतिशय धक्कादायक घटना घडली. इथे वाट चुकलेल्या दोन ड्रायव्हर्सना गावकर्‍यांनी बेदम मारहाण करत ठार केलं. होंडा सिटी आणि इनोव्हा या दोन गाड्या संध्याकाळी उशिरा बोईसरमधल्या गुंडले गावात शिरल्या. वाट चुकल्यामुळे हे दोन ड्रायव्हर या गावात आले. पण हे लोक लहान मुलांना चोरण्यासाठी आल्याचा संशय गावकर्‍यांना आला आणि त्यामुळेच गावकर्‍यांनी फावड्‌यासारख्या अवजारांनी त्या दोघांवर हल्ला चढवला. दोघांना इतकी मारहाण करण्यात आली की त्यात त्यांचा जीव गेला. हे दोघं मुंबईतले राहणारे असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. बोईसर भागात लहान मुलांना चोरणारी टोळी सक्रीय असल्याची अफवा गेल्या काही दिवसांपासून पसरलीय. त्यामुळे गावात रात्री पहाराही दिला जातो. पण मुलं चोरीचा असा कुठलाही प्रकार याआधी घडला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. पण या अफवेमुळे दोन तरुणांना आपला जीव गमवावा लागला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 4, 2012 05:59 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close