S M L

अण्णा पाच राज्यात प्रचार करणार नाहीत - किरण बेदी

05 जानेवारीजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तब्येतीच्या कारणावरून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निदान एक महिना तरी प्रचार करणार नाहीत असं टीम अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी स्पष्ट केलं आहे. किरण बेदींनी आज पुण्यात अण्णांची भेट घेतली. एक महिना डॉक्टरांनी अण्णांना विश्रांती घ्यायलाच पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर अण्णांची तब्येत पाहून कोअर कमिटी निर्णय घेईल असं किरण बेदींनी स्पष्ट केलं. त्यामुळे किमान एक महिना तरी अण्णा प्रचाराला जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. हिवाळी अधिवशेनात सक्षम लोकपाल विधेयक मंजूर केलं नाहीतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार असा इशारा अण्णांनी दिला होता. पण आता तब्येतीच्या कारणामुळे अण्णा प्रचार करणार नाहीत असं किरण बेदींनी स्पष्ट केलं आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 09:16 AM IST

अण्णा पाच राज्यात प्रचार करणार नाहीत - किरण बेदी

05 जानेवारी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तब्येतीच्या कारणावरून पाच राज्यांच्या निवडणुकांमध्ये निदान एक महिना तरी प्रचार करणार नाहीत असं टीम अण्णांच्या सहकारी किरण बेदी यांनी स्पष्ट केलं आहे. किरण बेदींनी आज पुण्यात अण्णांची भेट घेतली. एक महिना डॉक्टरांनी अण्णांना विश्रांती घ्यायलाच पाहिजे असं सांगितलं आहे. त्यानंतर अण्णांची तब्येत पाहून कोअर कमिटी निर्णय घेईल असं किरण बेदींनी स्पष्ट केलं. त्यामुळे किमान एक महिना तरी अण्णा प्रचाराला जाणार नाहीत हे स्पष्ट झालं आहे. हिवाळी अधिवशेनात सक्षम लोकपाल विधेयक मंजूर केलं नाहीतर पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसविरोधात प्रचार करणार असा इशारा अण्णांनी दिला होता. पण आता तब्येतीच्या कारणामुळे अण्णा प्रचार करणार नाहीत असं किरण बेदींनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 09:16 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close