S M L

फसवणूक प्रकरणी आ. बोर्डीकरांचा जामीन अर्ज फेटाळला

05 जानेवारीपरभणी जिल्ह्यातल्या जिंतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर अडचणीत आले आहे. त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. बोर्डीकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. बँकेचे सभासद शेतकरी आणि पतपेढ्यांचे सभासद यांचा विमा काढण्याच्या नावाखाली सुमारे सात कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोर्डीकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्याने ते आता अडचणीत आलेत. बोर्डीकर यांच्यावर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बँकेचे सभासद शेतकरी आणि पतपेढ्यांचे सभासद यांचा विमा काढण्याच्या नावाखाली सुमारे सात कोटी 41 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात आणखी दोन जण आरोपी आहेत. आयुकेअर इन्शुरन्स यां कपनीचे चे अध्यक्ष कुंज बिहारी अग्रवाल आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक संचालक दिंगबर पवार यांच्याशी संगमत करुन ही फसवणूक करण्यात आलीय. याबाबत बँकेचे दुसरे एक संचालक स्वराज सिंग परिहार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यानंतर ही स्थानिक नवामोढा पोलीस स्टेशनचे अधिकारी , पोलीस अधीक्षक या बोर्डीकर यांच्या विरोधात काहिच कारवाई करत नाहीत. बोर्डीकर यांनी अटक पूर्व जामिनासाठी अनेक प्रयत्न केलेत. पण त्यांना ना अटक पूर्व जामीन मिळाला ना अंतरीम जामीन मिळाला नाही. या नंतर ही पोलीस कारवाई करत नाहीत.यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे सोपवावं अशी मागणी होत आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 02:24 PM IST

फसवणूक प्रकरणी आ. बोर्डीकरांचा जामीन अर्ज फेटाळला

05 जानेवारी

परभणी जिल्ह्यातल्या जिंतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार रामप्रसाद बोर्डीकर अडचणीत आले आहे. त्यांचा जामीन अर्ज सुप्रीम कोर्टाने फेटाळला आहे. बोर्डीकर हे परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष होते. बँकेचे सभासद शेतकरी आणि पतपेढ्यांचे सभासद यांचा विमा काढण्याच्या नावाखाली सुमारे सात कोटी 41 लाख रुपयांचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी बोर्डीकर यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. पण त्यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळल्याने ते आता अडचणीत आलेत.

बोर्डीकर यांच्यावर विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. बँकेचे सभासद शेतकरी आणि पतपेढ्यांचे सभासद यांचा विमा काढण्याच्या नावाखाली सुमारे सात कोटी 41 लाख रुपयांच्या रकमेचा अपहार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याच प्रकरणात आणखी दोन जण आरोपी आहेत. आयुकेअर इन्शुरन्स यां कपनीचे चे अध्यक्ष कुंज बिहारी अग्रवाल आणि परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एक संचालक दिंगबर पवार यांच्याशी संगमत करुन ही फसवणूक करण्यात आलीय. याबाबत बँकेचे दुसरे एक संचालक स्वराज सिंग परिहार यांनी तक्रार दाखल केल्यानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, यानंतर ही स्थानिक नवामोढा पोलीस स्टेशनचे अधिकारी , पोलीस अधीक्षक या बोर्डीकर यांच्या विरोधात काहिच कारवाई करत नाहीत. बोर्डीकर यांनी अटक पूर्व जामिनासाठी अनेक प्रयत्न केलेत. पण त्यांना ना अटक पूर्व जामीन मिळाला ना अंतरीम जामीन मिळाला नाही. या नंतर ही पोलीस कारवाई करत नाहीत.यामुळे हे प्रकरण सीबीआय कडे सोपवावं अशी मागणी होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 02:24 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close