S M L

महायुतीचा तिढा सुटला;पुढील आठवड्यात घोषणा

05 जानेवारीमहापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि राजकीय पक्षांची भाऊ गर्दी सुरु झाली आहे. काल काँग्रेस-राष्ट्रवादीने बैठक पार पडत नाही तोच आज महायुतीने बैठका लगावल्या. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयची आज शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. मुंबईत आरपीआयला 25 जागा देऊ केल्या आहे. तर आणखी 5 जागा रामदास आठवले यांनी मागितल्या आहेत. त्यावर समाधानकारक चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. आपल्याला 29 ते 30 जागा मिळण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.  पुन्हा 11 किंवा 12 जानेवारीला पुढची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपांची घोषणा होऊ शकते. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार उपस्थित आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते उपस्थित आहेत. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर उपस्थित आहेत. आरपीआयकडून रामदास आठवले, गौतम सोनावणे, काका खंबाळकर आणि दीपक निकाळजे उपस्थित आहेत.  दरम्यान, या बैठकीत आरपीआयवर नाराज होऊन नामदेव ढसाळ बैठकीतून बाहेर पडले. महायुतीत आपल्याला काही स्थान नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ढसाळ यांना पत्रकारांनी झालेल्या बैठकीबदल विचारले असता आरपीआयबद्दल आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. एक्याच्या काळात आम्ही अनेक घटकपक्षांचा प्रयोग केला पण आता आरपीयला त्याचेकाही महत्व राहिले नाही. आरपीआयच्या लोकांना आता मस्ती चढली आहे, त्यांना कोणाचे काही घेण देण नाही असा आरोप ढसाळ यांनी केला. जसा आठवलेंना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर आम्हालाही निर्णय घेता येऊ शकतो असा इशाराही ढसाळ यांनी दिला. ढसाळ यांची नाराजी दुर करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी फोन करुन समजूत काढली तसेच आठवले यांनीही झालेल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे पण अजूनही ढसाळ नाराज आहेत. 

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 02:45 PM IST

महायुतीचा तिढा सुटला;पुढील आठवड्यात घोषणा

05 जानेवारी

महापालिकांच्या निवडणुकांचे बिगुल वाजले आणि राजकीय पक्षांची भाऊ गर्दी सुरु झाली आहे. काल काँग्रेस-राष्ट्रवादीने बैठक पार पडत नाही तोच आज महायुतीने बैठका लगावल्या. जागावाटपाचा तिढा सोडवण्यासाठी शिवसेना, भाजप आणि आरपीआयची आज शिवसेना भवन येथे बैठक पार पडली. मुंबईत आरपीआयला 25 जागा देऊ केल्या आहे. तर आणखी 5 जागा रामदास आठवले यांनी मागितल्या आहेत. त्यावर समाधानकारक चर्चा झाल्याचे आठवले यांनी सांगितले आहे. आपल्याला 29 ते 30 जागा मिळण्याची शक्यता असल्याचा दावा त्यांनी केला.

 

पुन्हा 11 किंवा 12 जानेवारीला पुढची बैठक होणार आहे. त्यानंतर जागावाटपांची घोषणा होऊ शकते. या बैठकीत उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले, सुधीर मुनगंटीवार उपस्थित आहेत. शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी, सुभाष देसाई आणि दिवाकर रावते उपस्थित आहेत. भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, किरीट सोमय्या आणि अतुल भातखळकर उपस्थित आहेत. आरपीआयकडून रामदास आठवले, गौतम सोनावणे, काका खंबाळकर आणि दीपक निकाळजे उपस्थित आहेत.  

दरम्यान, या बैठकीत आरपीआयवर नाराज होऊन नामदेव ढसाळ बैठकीतून बाहेर पडले. महायुतीत आपल्याला काही स्थान नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. ढसाळ यांना पत्रकारांनी झालेल्या बैठकीबदल विचारले असता आरपीआयबद्दल आपली स्पष्ट नाराजी व्यक्त केली. एक्याच्या काळात आम्ही अनेक घटकपक्षांचा प्रयोग केला पण आता आरपीयला त्याचेकाही महत्व राहिले नाही. आरपीआयच्या लोकांना आता मस्ती चढली आहे, त्यांना कोणाचे काही घेण देण नाही असा आरोप ढसाळ यांनी केला. जसा आठवलेंना स्वतंत्रपणे निर्णय घेण्याचा अधिकार असेल तर आम्हालाही निर्णय घेता येऊ शकतो असा इशाराही ढसाळ यांनी दिला. ढसाळ यांची नाराजी दुर करण्यासाठी उध्दव ठाकरे यांनी फोन करुन समजूत काढली तसेच आठवले यांनीही झालेल्याप्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे पण अजूनही ढसाळ नाराज आहेत. 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 02:45 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close