S M L

फोटोफेअर एक्झिबिशनची धूम ; प्रेक्षक घामाघूम

05 जानेवारीसेकंदाला 25-25 पेक्षाही जास्त फ्रेम्स पकडणारे नव-नवीन डिजीटल कॅमेरे, फोटोशॉपला भरपूर प्लग इन्स आणि तासाभरात निघणारी 3-डी डिजीटल प्रिंट.अशी काही खास वैशिष्ट्य आहेत यंदाच्या मुंबईतल्या फोटोफेअर- 2012ची. भारतात दरवर्षी आणि मुंबईत दर दोन वर्षांनी भरणारे हे एक्झिबिशन फोटोग्राफर्ससह सगळ्याच हौशी मंडळीसाठी एक पर्वणी असते. गोरेगाव येथे हे एक्झिबिशन भरलं आहे या एक्झिबिशनमध्ये नवनवी गॅझेटस तर आहेतच, शिवाय स्टील फोटोग्राफीसाठीचं अनेक प्रकारचं सुलभ आणि नवीन तंत्रज्ञान आहे. फोटोनंतरच्या डिजीटल प्रक्रिया आणि दिलखेचक अल्बम मेकिंग यांचे बजेटमधले पर्यायही आहेत. व्हिडिओग्राफी आणि पोस्टप्रोडक्शन विभागात मात्र जरा निराशाजनक वातावरण आहे. प्रदर्शनाचं ( गुरुवारी ) म्हणजे आज उद्घाटन झालं. पण आयोजकांनी मात्र सावळा गोंधळाचा पुरता नमुना पेश केला. कुठल्या गेटनं आत जायचं हे धड कुणीही सांगत तर नव्हतंच, पण खंडणी मागितल्यासारखी पार्किंगचे पैसे मागणारी टोळकी जागोजागी दिसत होती. त्यामुळे एक्झिबिशनला भेट देणारे पुरते वैतागले होते.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 5, 2012 05:27 PM IST

फोटोफेअर एक्झिबिशनची धूम ; प्रेक्षक घामाघूम

05 जानेवारी

सेकंदाला 25-25 पेक्षाही जास्त फ्रेम्स पकडणारे नव-नवीन डिजीटल कॅमेरे, फोटोशॉपला भरपूर प्लग इन्स आणि तासाभरात निघणारी 3-डी डिजीटल प्रिंट.अशी काही खास वैशिष्ट्य आहेत यंदाच्या मुंबईतल्या फोटोफेअर- 2012ची. भारतात दरवर्षी आणि मुंबईत दर दोन वर्षांनी भरणारे हे एक्झिबिशन फोटोग्राफर्ससह सगळ्याच हौशी मंडळीसाठी एक पर्वणी असते. गोरेगाव येथे हे एक्झिबिशन भरलं आहे या एक्झिबिशनमध्ये नवनवी गॅझेटस तर आहेतच, शिवाय स्टील फोटोग्राफीसाठीचं अनेक प्रकारचं सुलभ आणि नवीन तंत्रज्ञान आहे.

फोटोनंतरच्या डिजीटल प्रक्रिया आणि दिलखेचक अल्बम मेकिंग यांचे बजेटमधले पर्यायही आहेत. व्हिडिओग्राफी आणि पोस्टप्रोडक्शन विभागात मात्र जरा निराशाजनक वातावरण आहे. प्रदर्शनाचं ( गुरुवारी ) म्हणजे आज उद्घाटन झालं. पण आयोजकांनी मात्र सावळा गोंधळाचा पुरता नमुना पेश केला. कुठल्या गेटनं आत जायचं हे धड कुणीही सांगत तर नव्हतंच, पण खंडणी मागितल्यासारखी पार्किंगचे पैसे मागणारी टोळकी जागोजागी दिसत होती. त्यामुळे एक्झिबिशनला भेट देणारे पुरते वैतागले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 5, 2012 05:27 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close