S M L

आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय लांबणीवर

7 जानेवारी, मुंबईकाँग्रेस नेत्यांच्या बैठकीत गुरुदास कामत यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांना दणका दिलाय. त्यामुळं जागावाटपाचा निर्णय दोन दिवस लांबणीवर पडलाय. गुरुदास कामत यांनी शुक्रवारी घेतलेल्या भूमिकेनंतर मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मोठा पेच निर्माण झाला होता. महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी नको, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांनी केली होती. त्यांनी याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. मुंबईत आघाडी केली तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल, असं कामत यांचं म्हणणं आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या आणि क्रमांक दोनच्या जागा राष्ट्रवादीला का सोडाव्या, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला होता. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मुंबईत स्वबळावर लढावं, असाही त्यांचा आग्रह आहे.कामत यांच्या या मागणीसंदर्भात पक्षातल्या पदाधिका•यांची मतं जाणून घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून बैठकांचं सत्र सुरु होणार आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य विभागातले पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादीसोबत बैठक होणार आहे. त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जागावाटपाची बैठक आता लांबणीवर पडलीय.काँग्रेसच्या गोटात या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनीच चर्चेची मुख्य सूत्रं हाती घेतली. तर तिकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपला पवित्रा बदलला नाही. 65 जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या आपल्या पक्ष सहका-यांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुंबईतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसशी बोलणी आणि आघाडी करतांना राष्ट्रवादीची व्यूहरचना काय असेल यावर चर्चा होणार आहे. आम्हाला आमची ताकद माहित आहे, मुंबईत आमचा एक खासदारही वाढलाय, त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण काय बोलतं याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही, असं मत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी व्यक्त केलंय.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 03:34 PM IST

आघाडीच्या जागावाटपाचा निर्णय लांबणीवर

7 जानेवारी, मुंबई

काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत गुरुदास कामत यांनी मांडलेल्या मागण्यांचा विचार करण्याचा निर्णय घेऊन मुख्यमंत्र्यांनी कृपाशंकर सिंह यांना दणका दिलाय. त्यामुळं जागावाटपाचा निर्णय दोन दिवस लांबणीवर पडलाय.

गुरुदास कामत यांनी शुक्रवारी घेतलेल्या भूमिकेनंतर मुंबईत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीत मोठा पेच निर्माण झाला होता. महानगरपालिका निवडणुकांसाठी आघाडी नको, अशी मागणी मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि पक्षाचे मुंबईतले खासदार गुरुदास कामत यांनी केली होती. त्यांनी याबद्दल पक्षाध्यक्षा सोनिया गांधींना पत्र लिहिलं. मुंबईत आघाडी केली तर काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणात बंडखोरी होईल, असं कामत यांचं म्हणणं आहे. गेल्या वेळी जिंकलेल्या आणि क्रमांक दोनच्या जागा राष्ट्रवादीला का सोडाव्या, असा थेट प्रश्न त्यांनी विचारला होता. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी मुंबईत स्वबळावर लढावं, असाही त्यांचा आग्रह आहे.

कामत यांच्या या मागणीसंदर्भात पक्षातल्या पदाधिका•यांची मतं जाणून घेण्यासाठी रविवारी दुपारी तीन वाजल्यापासून बैठकांचं सत्र सुरु होणार आहे. उत्तर मुंबई, उत्तर पश्चिम, उत्तर मध्य विभागातले पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांची बैठक होणार आहे. या बैठकीत सर्वांची मतं जाणून घेतल्यानंतरच राष्ट्रवादीसोबत बैठक होणार आहे. त्यामुळं आता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या जागावाटपाची बैठक आता लांबणीवर पडलीय.काँग्रेसच्या गोटात या हालचाली सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनीच चर्चेची मुख्य सूत्रं हाती घेतली. तर तिकडे, राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र आपला पवित्रा बदलला नाही. 65 जागांच्या मागणीवर राष्ट्रवादी ठाम आहे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार उद्या आपल्या पक्ष सहका-यांची बैठक बोलावण्याची शक्यता आहे. या बैठकीमध्ये मुंबईतील जागावाटपासंदर्भात काँग्रेसशी बोलणी आणि आघाडी करतांना राष्ट्रवादीची व्यूहरचना काय असेल यावर चर्चा होणार आहे. आम्हाला आमची ताकद माहित आहे, मुंबईत आमचा एक खासदारही वाढलाय, त्यामुळे काँग्रेसमध्ये कोण काय बोलतं याला आमच्या दृष्टीने महत्त्व नाही, असं मत मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष नरेंद्र वर्मा यांनी व्यक्त केलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 03:34 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close