S M L

नाशिकमध्ये कांदा मार्केट बंद

09 जानेवारीनाशिक जिल्ह्यातील लेव्ही वसुलीसाठी व्यापार्‍यांनी कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आज बाजार समिती कांदा मार्केट बंद पडला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना लेव्ही वसुलीच्या नोटिसा बजावली. त्या मागे घेण्याची व्यापार्‍यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिसा मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. याचसंदर्भात पणन मंत्र्यांना असोसिएशनचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात भेटणार आहे. कांदा मार्केटमधल्या माथाडी कामागारांबद्दलची लेव्ही वसुली करण्याबाबत हा वाद सुरू आहे. ही लेव्ही कोणी भरावी यावरून हा वाद पेटला. जिल्हा परिषदेनं व्यापार्‍यांना या नोटिसा पाठवल्या. त्यानंतर व्यापार्‍यांनी लिलाव बंद करण्याचा इशारा दिला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 09:56 AM IST

नाशिकमध्ये कांदा मार्केट बंद

09 जानेवारी

नाशिक जिल्ह्यातील लेव्ही वसुलीसाठी व्यापार्‍यांनी कांद्याच्या लिलावावर बहिष्कार टाकला आहे. त्यामुळे आज बाजार समिती कांदा मार्केट बंद पडला आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार जिल्हाधिकार्‍यांनी व्यापार्‍यांना लेव्ही वसुलीच्या नोटिसा बजावली. त्या मागे घेण्याची व्यापार्‍यांची मागणी आहे. जोपर्यंत नोटिसा मागे घेतल्या जात नाही तोपर्यंत लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशनने घेतला आहे. याचसंदर्भात पणन मंत्र्यांना असोसिएशनचं शिष्टमंडळ थोड्याच वेळात भेटणार आहे. कांदा मार्केटमधल्या माथाडी कामागारांबद्दलची लेव्ही वसुली करण्याबाबत हा वाद सुरू आहे. ही लेव्ही कोणी भरावी यावरून हा वाद पेटला. जिल्हा परिषदेनं व्यापार्‍यांना या नोटिसा पाठवल्या. त्यानंतर व्यापार्‍यांनी लिलाव बंद करण्याचा इशारा दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 09:56 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close