S M L

कोल्हापुरात टोलविरोधात नागरिकांचा हल्लाबोल

09 जानेवारीकोल्हापुरात टोलविरोधातीलं आंदोलन चांगलंच पेटले आहे. आज या टोल नाक्याच्या विरोधातच कोल्हापूर शहरात महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सकाळपासून शहरातील दुकानं बंद आहेत. दरम्यान, काल रात्री कसबा बावडा इथला आयआरबीनं उभारलेला टोल नाका अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. यापूर्वी शहरात अशाप्रकारे 4 टोल नाके फोडण्यात आले होते. त्यातच काल ही टोल नाका जाळण्याची घटना घडली. आजच्या महामोर्चा संदर्भात चौकाचौकात टोलविरोधी बॅनर्स लावण्यात आले आहे. 95 टक्के कामं झाल्याचा दावा करत आयआरबी कंपनीने शहरात टोल लावण्याचा प्रयत्न चालवलाय. पण शहराआंतर्गत टोल कुठेच नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या टोलला विरोध केला. आज निघालेल्या या महामोर्चामध्ये जवळपास एक लाख नागरिकांनी सहभाग घेतला होता.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 10:02 AM IST

कोल्हापुरात टोलविरोधात नागरिकांचा हल्लाबोल

09 जानेवारी

कोल्हापुरात टोलविरोधातीलं आंदोलन चांगलंच पेटले आहे. आज या टोल नाक्याच्या विरोधातच कोल्हापूर शहरात महामोर्चा काढण्यात आला. यावेळी सकाळपासून शहरातील दुकानं बंद आहेत. दरम्यान, काल रात्री कसबा बावडा इथला आयआरबीनं उभारलेला टोल नाका अज्ञात व्यक्तींनी पेटवून दिला. यापूर्वी शहरात अशाप्रकारे 4 टोल नाके फोडण्यात आले होते. त्यातच काल ही टोल नाका जाळण्याची घटना घडली. आजच्या महामोर्चा संदर्भात चौकाचौकात टोलविरोधी बॅनर्स लावण्यात आले आहे. 95 टक्के कामं झाल्याचा दावा करत आयआरबी कंपनीने शहरात टोल लावण्याचा प्रयत्न चालवलाय. पण शहराआंतर्गत टोल कुठेच नाही. त्यामुळे कोल्हापूरकरांनी या टोलला विरोध केला. आज निघालेल्या या महामोर्चामध्ये जवळपास एक लाख नागरिकांनी सहभाग घेतला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 10:02 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close