S M L

इस्त्रायली गे जोडपं बनलं बाळाचे बाप

20 नोव्हेंबरप्राची जतानियाएक इस्त्रायली जोडपं मुंबईत एका बाळाचं पालक बनलं आहे. आयव्हीएफ टेक्निकमुळे इस्त्रायली गे ना हे पालकत्वाचं सुख मिळालंय. भारतात समलिंगी संबंधांना आजही मान्यता नाही. समलिंगी संबंधांना बेकायदा ठरवणारं कलम 377 रद्द करण्यावरुन भारतात आजही वादंग सुरू आहेत. बाळाच्या पालकांचं नाव ओमर आणि योनातन गेर आहे. दोघेही समलैंगिक. अर्थात गे. मूळचे इस्त्रायलचे. पण हे दोघेही आज एका बाळाचे पालक बनले आहेत. आयव्हीएफ म्हणजेच इन व्हिट्रो फर्टीलायझेशन टेक्निकमुळे हे शक्य झालंय. त्यांच्या बाळानं मुंबईत जन्म घेतला. या दोघांना पालक बनवण्याचं धाडस अशा वेळेला केलंय की जेव्हा भारतात समलैंगिक संबंधांना मान्यता मिळावी, यासाठी गे कार्यकर्ते जोरदार लॉबींग करीत आहेत. कलम 377 रद्द करण्याची ते मागणी करीत आहेत. दोघांनी बाळासाठी स्त्री बीज निवड करतानाही बरीच शोधाशोध केली. स्त्रीबीजाची निवड करतानाही त्यांनी सर्वात जास्त आयक्यु असलेल्यालाच त्यांनी प्राधान्य दिलं. या बाळाचं नावं ठेवलंय इव्यातार. यानं आपल्या जन्मानंतरचा एक महिनाचा वाढदिवसही साजरा केलाय. ' भारतात जेव्हा या संबंधांना मान्यता मिळेल तेव्हा या दोघांसारखी किती जोडपी पालक होण्यासाठी पुढं येतील हे पाहणं इंटरेस्टींग ठरणार आहे ', फर्टीलिटी एक्स्पर्ट डॉ. गौतम अलाहाबादी यांनी सांगितलं. हे दोघंही अगदी कट्टर परंपरावादी अशा इस्त्रायलमधलेच आहेत. बाळाचं पालकत्व निभावणं, त्यांच्यासाठीही मोठं आव्हान असणार आहे. पण या दोघांनी पालक होण्याचा घेतलेला निर्णय खूप क्रांतीकारी ठरणार आहे. जगभरातल्या गे जोडप्यांना त्यामुळं पालक होण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 12:19 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 12:19 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close