S M L

अण्णांना उद्या मिळणार डिस्चार्ज

07 जानेवारीजेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अखेर उद्या सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अण्णांवर उपचार करणारे डॉ. के. एच. संचेती यांनी ही माहिती दिली. अण्णांनी प्रकृती आता चांगली सुधारणा झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या तब्येतीचा आढावा घेऊन मग त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 31 डिसेंबरपासून अण्णा पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पण अण्णांना आणखी एक महिना सक्तीनं विश्रांती घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत तीन दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपोषणा अगोदर अण्णा आजारी पडले होते. यापरिस्थितीही अण्णांनी दोन दिवसांचे मुंबईतील नियोजित एमएमआरडीए मैदानावर उपोषण केलं. उपोषणाअगोदर अण्णांना आजारी असल्यामुळे ऐन उपोषणांच्या आदल्यादिवशी प्रवास, आणि उपोषणाच्या दिनी वाहन रॅली, धावपळ यामुळे अण्णांची प्रकृती खालवल्याचे पहिल्यादिवशी स्पष्ट झालं होतं. उपोषणाच्या पहिल्यादिवशीच टीम अण्णांनी अण्णांनी उपोषण सोडावे असा आग्रह धरला होता. मात्र अण्णांनी उपोषणावर ठाम राहत नकार दिला. मात्र प्रकृती खालावत गेल्यामुळे अण्णांनी दुसर्‍यादिवशी उपोषण सोडले. मुंबईत एक दिवस उपचार घेऊन अण्णांना राळेगणला रवाना झाले. पण अण्णांनी तब्येत काही फरक पडला नाही. अखेर डॉ.संचेती यांनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. अण्णांवर आठवडाभर उपचारानंतर आज अण्णांनी प्रकृती सुधारणा झाली आहे. मात्र उपचार सुरु असताना टीम अण्णांच्या सहकारी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी अण्णा पाच राज्यात काँग्रेसविरोधात प्रचार करणार नाही अशी घोषणा केली. आता अण्णांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे यानंतर टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. आता या बैठकीत आंदोलनाची काय रणनिती आखली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 7, 2012 02:01 PM IST

अण्णांना उद्या मिळणार डिस्चार्ज

07 जानेवारी

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना अखेर उद्या सकाळी डिस्चार्ज देण्यात येणार आहे. अण्णांवर उपचार करणारे डॉ. के. एच. संचेती यांनी ही माहिती दिली. अण्णांनी प्रकृती आता चांगली सुधारणा झाली आहे. उद्या सकाळी पुन्हा एकदा त्यांच्या तब्येतीचा आढावा घेऊन मग त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार आहे. 31 डिसेंबरपासून अण्णा पुण्याच्या संचेती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत. पण अण्णांना आणखी एक महिना सक्तीनं विश्रांती घ्यायचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

सक्षम लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे यांनी मुंबईत तीन दिवस आंदोलन करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र उपोषणा अगोदर अण्णा आजारी पडले होते. यापरिस्थितीही अण्णांनी दोन दिवसांचे मुंबईतील नियोजित एमएमआरडीए मैदानावर उपोषण केलं. उपोषणाअगोदर अण्णांना आजारी असल्यामुळे ऐन उपोषणांच्या आदल्यादिवशी प्रवास, आणि उपोषणाच्या दिनी वाहन रॅली, धावपळ यामुळे अण्णांची प्रकृती खालवल्याचे पहिल्यादिवशी स्पष्ट झालं होतं. उपोषणाच्या पहिल्यादिवशीच टीम अण्णांनी अण्णांनी उपोषण सोडावे असा आग्रह धरला होता. मात्र अण्णांनी उपोषणावर ठाम राहत नकार दिला. मात्र प्रकृती खालावत गेल्यामुळे अण्णांनी दुसर्‍यादिवशी उपोषण सोडले. मुंबईत एक दिवस उपचार घेऊन अण्णांना राळेगणला रवाना झाले. पण अण्णांनी तब्येत काही फरक पडला नाही. अखेर डॉ.संचेती यांनी अण्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याचा सल्ला दिला. अण्णांवर आठवडाभर उपचारानंतर आज अण्णांनी प्रकृती सुधारणा झाली आहे. मात्र उपचार सुरु असताना टीम अण्णांच्या सहकारी आणि माजी आयपीएस अधिकारी किरण बेदी यांनी अण्णा पाच राज्यात काँग्रेसविरोधात प्रचार करणार नाही अशी घोषणा केली. आता अण्णांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहे यानंतर टीम अण्णांच्या कोअर कमिटीची बैठक होणार आहे. आता या बैठकीत आंदोलनाची काय रणनिती आखली जाते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 7, 2012 02:01 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close