S M L

पेस-टिपसारेविक जोडीने पटकावले चेन्नई ओपनचे जेतेपद

09 जानेवारीभारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसनं नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. चेन्नई ओपन स्पर्धेत पेसनं त्याचा जोडीदार यान्को टिपसारेविकच्या साथीनं डबल्सचं जेतेपद पटकावलं आहे. लिएंडर पेस आणि महेश भूपती ही भारताची जोडी विभक्त झाल्यानंतर दोघांनीही नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोडीदारासह केली. पेस-यान्को जोडीनं फायनलमध्ये इस्त्रायलच्या अँडी राम आणि जोनाथन एरलिच जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पेस-यान्को जोडीने सलग तीन गेम जिंकत पहिला सेट आरामात जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही या जोडीने वर्चस्व राखत जेतेपद पटकावले. दरम्यान, चेन्नई ओपनच्या सिंगलमध्ये कॅनडाचा मिलोस रॉनिक विजयी ठरला. फायनलमध्ये त्यानं सर्बियाच्या यान्को टिपसारेविकचा पराभव केला.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 10:40 AM IST

पेस-टिपसारेविक जोडीने पटकावले चेन्नई ओपनचे जेतेपद

09 जानेवारी

भारताचा टेनिस स्टार लिएंडर पेसनं नव्या वर्षाची दमदार सुरुवात केली आहे. चेन्नई ओपन स्पर्धेत पेसनं त्याचा जोडीदार यान्को टिपसारेविकच्या साथीनं डबल्सचं जेतेपद पटकावलं आहे. लिएंडर पेस आणि महेश भूपती ही भारताची जोडी विभक्त झाल्यानंतर दोघांनीही नव्या वर्षाची सुरुवात नव्या जोडीदारासह केली. पेस-यान्को जोडीनं फायनलमध्ये इस्त्रायलच्या अँडी राम आणि जोनाथन एरलिच जोडीचा 6-4, 6-4 असा सरळ सेटमध्ये पराभव केला. पेस-यान्को जोडीने सलग तीन गेम जिंकत पहिला सेट आरामात जिंकला. दुसर्‍या सेटमध्येही या जोडीने वर्चस्व राखत जेतेपद पटकावले. दरम्यान, चेन्नई ओपनच्या सिंगलमध्ये कॅनडाचा मिलोस रॉनिक विजयी ठरला. फायनलमध्ये त्यानं सर्बियाच्या यान्को टिपसारेविकचा पराभव केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 10:40 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close