S M L

'कोणत्याही पक्षाविरोधात प्रचार करणार नाही'

09 जानेवारीआगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करून प्रचार करायचा नाही असा निर्णय टीम अण्णांनी घेतला आहे. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय मात्र अण्णा हजारे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या अयशस्वी आंदोलनानंतर अण्णांच्या अनुपस्थित टीम अण्णांच्या कोअर कमिटीची आज दिल्लीत पहिलीच बैठक झाली. त्यात पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांना एक पत्र पाठवलं होतं. आणि कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करण्याऐवजी भ्रष्ट उमेदवाराला मत देऊ नका, असा प्रचार करा असा सल्ला दिला होता. तसेच प्रचार जनलोकपालवर लक्ष केंद्रीत करण्याची सुचनाही केली होती. त्यांची सुचना लक्षात घेऊन टीम अण्णांनी कोणत्याही विशिष्ट पक्षाविरोधात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रशांत भूषण, अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास हे अण्णांचे सहकारी राळेगणला जाणार आहेत. आणि बैठकीतल्या चर्चेची माहिती अण्णांना देणार आहेत. त्यावेळी आंदोलनाची पुढची दिशाही ठरवली जाण्याची शक्यता आहे.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 9, 2012 03:03 PM IST

'कोणत्याही पक्षाविरोधात प्रचार करणार नाही'

09 जानेवारी

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करून प्रचार करायचा नाही असा निर्णय टीम अण्णांनी घेतला आहे. पण त्याबाबतचा अंतिम निर्णय मात्र अण्णा हजारे यांच्यावर सोपवण्यात आला आहे. मुंबईत झालेल्या अयशस्वी आंदोलनानंतर अण्णांच्या अनुपस्थित टीम अण्णांच्या कोअर कमिटीची आज दिल्लीत पहिलीच बैठक झाली. त्यात पाच राज्यांच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी टीम अण्णांना एक पत्र पाठवलं होतं. आणि कोणत्याही एका पक्षाला टार्गेट करण्याऐवजी भ्रष्ट उमेदवाराला मत देऊ नका, असा प्रचार करा असा सल्ला दिला होता. तसेच प्रचार जनलोकपालवर लक्ष केंद्रीत करण्याची सुचनाही केली होती. त्यांची सुचना लक्षात घेऊन टीम अण्णांनी कोणत्याही विशिष्ट पक्षाविरोधात प्रचार न करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या प्रशांत भूषण, अरविंद केजरीवाल आणि कुमार विश्वास हे अण्णांचे सहकारी राळेगणला जाणार आहेत. आणि बैठकीतल्या चर्चेची माहिती अण्णांना देणार आहेत. त्यावेळी आंदोलनाची पुढची दिशाही ठरवली जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 9, 2012 03:03 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close