S M L

काँग्रेसविरोधात प्रचार नाही :टीम अण्णा

10 जानेवारीआगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाविरोधात प्रचार करणार नाही, पण दौरा मात्र करणार अशी घोषणा टीम अण्णांनी केली. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी आज राळेगणमध्ये अण्णांची भेट घेतली. आणि काल कोअर कमिटीत घेतलेल्या निर्णयाबद्दल अण्णांना माहिती दिली. कोणत्याही एका पक्षाविरोधात प्रचार करायचा नाही, या निर्णयावर अण्णांनीही शिक्कामोर्तब केल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं. पण, टीम अण्णा पाच राज्यांच्या दौर्‍यावर जाणार आणि लोकपालबाबत राजकीय पक्षांची भूमिका जनतेसमोर ठेवू असं त्यांनी स्पष्ट केलं. अण्णांची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीय. तब्येत बरी झाल्यानंतर अण्णा दौर्‍याबाबत निर्णय घेणार आहेत. 26 जानेवारीला दिल्लीत सभा घेऊन विचारमंथन करणार असल्याचं प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केलं.

आईबीएन लोकमत | Updated On: Jan 10, 2012 09:36 AM IST

काँग्रेसविरोधात प्रचार नाही :टीम अण्णा

10 जानेवारी

आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये कोणत्याही पक्षाविरोधात प्रचार करणार नाही, पण दौरा मात्र करणार अशी घोषणा टीम अण्णांनी केली. टीम अण्णांचे सदस्य अरविंद केजरीवाल आणि प्रशांत भूषण यांनी आज राळेगणमध्ये अण्णांची भेट घेतली. आणि काल कोअर कमिटीत घेतलेल्या निर्णयाबद्दल अण्णांना माहिती दिली. कोणत्याही एका पक्षाविरोधात प्रचार करायचा नाही, या निर्णयावर अण्णांनीही शिक्कामोर्तब केल्याचे केजरीवाल यांनी सांगितलं. पण, टीम अण्णा पाच राज्यांच्या दौर्‍यावर जाणार आणि लोकपालबाबत राजकीय पक्षांची भूमिका जनतेसमोर ठेवू असं त्यांनी स्पष्ट केलं. अण्णांची तब्येत अजून पूर्णपणे बरी झालेली नाहीय. तब्येत बरी झाल्यानंतर अण्णा दौर्‍याबाबत निर्णय घेणार आहेत. 26 जानेवारीला दिल्लीत सभा घेऊन विचारमंथन करणार असल्याचं प्रशांत भूषण यांनी स्पष्ट केलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Jan 10, 2012 09:36 AM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close