S M L

सांगलीतली राज्य नाट्यस्पर्धा

20 नोव्हेंबर, सांगलीआसीफ मुर्सल सांगलीतील स्थानिक नाट्यकलावंताना हक्काचं व्यासपीठ मिळावं म्हणून राज्यशासनाच्या वतीनं राज्यनाट्य स्पर्धा घेण्यात येत आहे. त्यामुळे अनेक हौशी आणि प्रतिभावंत कलाकारांना मराठी रंगभूमी आणि सिनेक्षेत्रात चमकण्याची संधी मिळणारेय.छोट्या गावातील नाट्यसंस्था, कलावंत, लेखक आणि दिग्दर्शक यांना एक सन्माननीय व्यासपीठ राज्यशासनाच्या वतीनं राज्यनाट्य स्पर्धांच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलं जातं.आणि त्यामुळंच अनेक अस्सल मुशीतले कलाकार रंगभूमीला मिळाले आहेत. रमेश भाटकर, मुक्ता बर्वे या अशाच काही नावाजलेल्या कलाकारांचा आदर्श डोळ्यांपुढे ठेऊन नवे कलाकार पुढे येऊ पाहताहेत. अशा स्पर्धांतून विविध विषयांवरची नाटकं सादर केली जात आहेत. या स्पर्धांचा बाज जरी प्रायोगिक रंगभूमीचा असला तरी त्यातून व्यावसायिक नाटकाची थीम स्पष्ट होते.. असाचं एक प्रकार दादा लगीन या नाटकातून पहायला मिळतो. हे नाटक व्यावसायिक रंगभूमीवर आणण्याचा दिग्दर्शकाचा प्रयत्न आहे. " राज्यनाट्य स्पर्धा जाहिर झाल्यावर हौशी कलावंत लगबगीनं नाटकाचा सर्व बाजूनं गांभीर्यानं विचार करायला लागतात. पण स्पर्धा संपल्यावर पुन्हा आपल्या कामात मग्न होतात. अशा कलाकारांनी रंगभूमीशी आणि कलेशी बांधिलकी जपली पाहिजे," अशी माहिती राज्य नाट्य स्पर्धेचे परीक्षक नरेंद्र आमले यांनी दिली. शेवटी काय तर रंगभूमीवर जोपर्यंत कलाकार आपली प्रतिभा सिद्ध करत नाहीत तोपर्यंत त्यांना कौतुकाची थाप मिळत नाही. आणि म्हणूनच त्यांना योग्य ती संधी मिळणं गरजेचं आहे. तसंच प्रत्येक कलाकारानं कलेचा आदर राखत तिच्याशी हातमिळवणी करायला हवी, तेव्हाच ग्रामीण भागातल्याही कलाकारांना व्यावसायिक रंगभूमीची दालनं खुली होतील.

आईबीएन लोकमत | Updated On: Nov 20, 2008 12:28 PM IST

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 20, 2008 12:28 PM IST

लोकप्रिय बातम्या

ताज्या बातम्या

ibnlokmat
close